ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल नागपुरात सुरू

jitendra.dhabarde@gmail.com 2022-12-14 17:57:59.0
img

नागपूर : ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (GIIS) नागपुरात सुरू झाले आहे. प्रिमियर इंटरनॅशनल स्कूलचे एक अग्रणी जागतिक स्तराचे नेटवर्क आणि ग्लोबल स्कूल फाउंडेशन (GSF) सदस्य, यांनी त्यांचे 17वे स्मार्ट कॅम्पस नागपूर (महाराष्ट्र) येथे लॉन्च केले आहे. त्यांचे सद्य स्थितीत 16 कॅम्पस सिंगापूर, मलेशिया, जपान, थायलंड, UAE आणि भारत येथे आहेत.

फेब्रुवारी 2023 मध्ये संचालित होणारे हे कॅम्पस 6.5 एकर्स जागेत विस्तारलेले आहे आणि यामध्ये 500 सीटरचे प्रेक्षागृह आहे, तसेच डिझाईन आणि इनॉव्हेशन लॅब अधिक रेडिओ, टिव्ही आणि व्हिज्युअल आर्ट स्टुडिओ इत्यादी उपलब्ध आहे. GIISचे पुरस्कार-विजेते 9 GEMS फ्रेमवर्क शैक्षणिक विषयांचे स्पोर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स, एन्टरप्रिन्युअरशिप आणि चारित्र्य विकासासह उत्कृष्टतेचे संतुलन साधते. अनुभवी आणि उत्साही शिक्षकांची एक समर्पित टीम आणि अत्याधुनिक कॅम्पससह, GIIS विद्यार्थ्यांना एक समग्र विकासाचे वातावरण पुरवते जे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यात मदत करते आणि ज्यामुळे प्रतिभावंत "जन-झेअर्सच्या? एका विशाल समुदायामध्ये योगदान केले जाते. नागपूरमध्ये एका पत्रकार परिषदेला संबोधताना, राजीव बन्सल, संचालक-ऑपरेशन्स, GIIS इंडिया म्हणाले, "आमचे संस्थापक आणि अध्यक्ष अतुल तेमुर्णिकर हे नागपूरचे आहेत आणि त्यांची दीर्घ काळापासून इच्छा होती की या प्रदेशात एका सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय शाळेची उभारणी करून समाजाची काही परतफेड करावी. त्यांची ही इच्छा सोबत एक आयटी, लॉजिस्टिक्स आणि एरोस्पेस मेन्टेनन्स हब म्हणून शहराचा वेगाने झालेला विकास यामुळे आमचा 17वा जागतिक कॅम्पस सरळ येथे नागपूरमध्ये येण्याचा परिणाम झाला. आम्ही येथील "जन-झेअर्सना? एक अत्याधुनिक, नव-युगातील सशक्त आणि तंत्रज्ञान-सहाय्यासह असलेला एक स्मार्ट कॅम्पस मिळण्याची खात्री करण्यामध्ये आम्ही कोणतीही कसूर ठेवलेली नाही."

सम्मिलित झालेल्या माध्यमांना त्यांच्या संदेशामध्ये, अतुल तेमुर्णिकर, सह-संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष, ग्लोबल स्कूल्स फाउंडेशन, म्हणाले, "दीर्घ काळापासून असा एक स्मार्ट कॅम्पस निर्माण करून माझ्या शहराला मला काही परत द्यायची इच्छा होती जी येथील युवा मनांना त्यांचे अस्सल सामर्थ्य शोधण्यात, त्यांच्या कौशल्यांचा सराव करण्यात आणि एक यशस्वी जागतिक नागरिक म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यात सक्षम करेल. आज हे पाहून मला अत्यंत आनंद होत आहे की ती इच्छा आणि स्वप्न वास्तवात उतरले आहे. हा नवीन कॅम्पस याची पुनर्व्याख्या करेल की या प्रदेशातील पालक आणि विद्यार्थी कशासह परिचित आहेत आणि जागतिक स्तरावर सिद्ध झालेल्या शिक्षणाच्या सर्वोत्तम प्रथा आणि नव-युगातील शिकण्याच्या पद्धतींचा अभिमान बाळगेल."

Related Post