Sun Nov 24 11:22:11 IST 2024
नागपूर : तब्बल 41 वर्षांनंतर नागपुरात इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे आयोजन करण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन (IPCA) आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्तवतीने 20 ते 22 जानेवारी दरम्यान 72 व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस (IPC) चे आयोजन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोड वरील जमनालाल बजाज प्रशासकीय भवन इमारतीच्या परिसरात करण्यात येत आहे. शुक्रवार, 20 जानेवारी रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते आयपीसी- 2023 चे उद्घाटन होणार असून आणि डॉ. अजित सिंग, अध्यक्ष, एसीजी कॅप्सूल लिमिटेड, डॉ. वेणुगोपाल सोमाणी, डीजीसीआय, भारत सरकार यांचीही उपस्थिती राहील. इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस ही देशभरातील फार्मा-व्यावसायिकांची एक संस्था असून देशाच्या कानाकोपऱ्यातील व्यावसायिक आरोग्य आणि विशेषत: फार्मसीशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येतात. फार्मा इंडस्ट्रीज, नियामक संस्था, संशोधन आणि विकास संस्था, फार्मा मशिनरी इंडस्ट्री, एपीआय, एक्सीपियंट्स आणि केमिकल इंडस्ट्री, शिक्षक मंडळी आणि देशविदेशातील विद्यार्थी असे सुमारे 10,000 प्रतिनिधी या कॉँग्रेससाठी एकत्र येत आहेत. देशाच्या विविध भागांतील शिक्षणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि तज्ञांना एकत्र आणून ज्ञान आणि विचारांची देवाणघेवाण करणे, हा काँग्रेसचा उद्देश आहे. तसेच, हेल्थ केअर सिस्टीममध्ये फार्मासिस्टच्या भूमिकेचे सखोल विश्लेषण प्रदान करणे आणि शैक्षणिक, संशोधन क्षेत्रातील सहभागींचे ज्ञान अद्ययावत करणे, हा देखील या कॉँग्रेसच्या आयोजनामागचा हेतू आहे. 72 व्या आयपीसीची संकल्पना 'गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी वैद्यकीय उत्पादने सहज प्राप्त करता येणे' या विषयावर केंद्रित आहे. कोविड-19 महामारीमुळे दोन वर्षांनी ही इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस आयोजित केली जात असून आयपीसीच्या स्थानिक आयोजन समितीने (एलओसी) सीईओ कॉन्क्लेव्ह सारख्या महत्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात जेनक्रेस्ट इनकॉर्पोरेशन औषध निर्मिती उद्योगांमधील 20 हून अधिक अध्यक्ष, सीईओ आणि एमडी, सुवेन लाइफ सायन्सेस, फायझर, ब्लु क्रॉस, अजंता फार्मा; अरबिंदो; ऑर्बिक्युलर; एएमटीझेड, भारत बायोटेक, भारत सिरम अँड वॅकसिन, होरिबा, पल्स फार्मा, व्हायाट्रिस (मायलॅन), इंडोको रेमिडीज, बैद्यनाथ, विको, फोर्टस, नितिका फार्मास्युटिकल्स, झिम लेबोरेटारिज, जेनेटेक, जेबी केमिकल्स पुणे, जिनुओ बायोटेक्नॉलॉजी इत्यादींचे प्रतिनिधी आणि अधिकारी यांचा यात सहभाग राहणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि आयपीसीचे मुख्य प्रवर्तक माननीय नितीन गडकरी यांच्या सोबत फार्मास्युटिकल क्षेत्रातील भविष्यातील समाजोपयोगी योजना आणि संधींबद्दल चर्चा करतील. श्री. अतुल मांडलेकर, अध्यक्ष, एलओसी टीमचे प्रमुख आणि संयोजन सचिव डॉ. मिलिंद जे. उमेकर, एपीटीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रो. प्रकाश इटनकर, फार्मास्युटिकल सायन्स विभाग सर्व एलओसी टीमसह या आयपीसी-2023 चे समन्वयन करीत आहेत. या आयपीसीमध्ये वैद्यकीय उपकरणांचा एक्स्पो, ब्लॉक चेन तंत्रज्ञानावरील वैज्ञानिक सत्रे, कृत्रिम बुद्धिमत्ता, फार्मा उद्योगातील ऑटोमेशन, एचव्हीएसी, ट्रॅक आणि ट्रेस यंत्रणा, एमएसएमई, उत्पादन उद्योग आणि पॅकेजिंग उद्योग, एपीआय आणि एक्सीपियंट्स, नॅनोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फार्मा कॉनॉलॉजी, फार्मा, कॉर्पोरेट कॉर्पोरेशन यांसारखे विविध कार्यक्रम तसेच फार्माकोजेनॉमिक्स, मेडिकल कोडिंग, फार्मास्युटिकल रेग्युलेटरी अफेअर्स, जेरियाट्रिक आणि पेडियाट्रिक मेडिकेअर, कॉस्मेस्युटिकल्स आणि न्यूट्रास्युटिकल, पर्सनलाइज्ड हेल्थकेअर, आयपीआर, सीआरओ, बायोसिमिलर्स आणि कॅन्सर रिसर्च, नॅचरल्स बायोटेक आणि एचआर कॉन्क्लेव्ह आयोजिण्यात आले आहे. फार्मास्युटिकल, मेडिकल आणि फार्माकोलॉजिकल सायन्स, औषध शोध आणि आरोग्य शिक्षणातील नविनतम ज्ञान या आयपीसीच्या मंचावर सादर होतील. आयोजकांनी 13 सिम्पोजियम आणि पूर्ण सत्रांतर्गत 39 व्याख्याने आयोजित करण्याची योजना आखली असून एकूण 85 वक्ते, रिसोर्स पर्सन यांनी तीन दिवसांच्या कॉंग्रेस दरम्यान विविध वैज्ञानिक सत्रांमध्ये व्याख्यान देण्यास सहमती दर्शवली आहे. वैद्यकीय उपकरणे, मशिनरी, पुस्तकांचा समावेश सर्व फार्मसी व्यवसायातील प्रतिनिधींचा समावेश करून 72 व्या आयपीसीची एलओसी तयार करण्यात आली आहे. फार्मा उद्योग आणि व्यापाऱ्यांच्या भविष्यातील आस्थापनांसाठी, देशभरातील 200 हून अधिक प्रदर्शकांच्या सहभागासह एक मेगा फार्मा आणि यंत्रसामग्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या एक्स्पोमध्ये ते त्यांची नवीनतम उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवा प्रदर्शित करतील. स्टॉल्समध्ये वैद्यकीय उपकरणे, फार्मा मशिनरी, प्रयोगशाळेतील उपकरणे, औषध उत्पादने, पुस्तके आणि जर्नल्स, फार्मा एक्सिपियंट्स इत्यादींचा समावेश आहे. आयपीसी एक्स्पोमध्ये प्रथमच वैद्यकीय उपकरणांचे स्टॉल देखील असतील. फार्मा क्षेत्रातील नवउद्योजकांना मदत करण्यासाठी, तरुण पदवीधरांना फार्मा व्यवसायात प्रवेश करण्यास प्रवृत्त करण्याच्या आशेने आयपीसी फार्मा सीईओ आणि एचआर व्यवस्थापकांची संवादात्मक सत्रे आयोजित करेल. सीईओ कॉन्क्लेव्हमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे मंत्री, औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडिया आणि आघाडीच्या फार्मा कंपन्यांचे कॅप्टन सहभागी होतील.
उद्घाटन सत्रानंतर डॉ. अजित सिंग, अध्यक्ष, एसीजी कॅप्सूल लिमिटेड, डॉ. वेणुगोपाल सोमाणी, डीजीसीआय, भारत सरकार आणि अध्यक्ष आयपीसीए - 2022 आणि डॉ. टीव्ही. नारायणा, सचिव, आयपीसीए आणि अध्यक्ष, आयपीए यांच्या उपस्थितीत 'गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी वैद्यकीय उत्पादने सहज प्राप्त करता येणे' या विषयावर अध्यक्षीय परिसंवाद होईल. 'मेडिकल डिव्हाईस इंडस्ट्री : व्हिजन 2030', 'फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी आणि डीडीएसमधील प्रगती', 'डिजिटल थेरप्युटिक्स आणि रेग्युलेटरी अफेअर्स: डायनॅमिक्स, ड्रग डिस्कव्हरी: ब्रेकथ्रू आणि इमर्जिंग ट्रेंडिंग', 'ट्रान्सफॉर्मिंग इन्फेक्ट्स', 'ट्रान्सफॉर्मिंग इन्फेक्ट्स' या विषयांवर इतर परिसंवाद आयोजित केले आहेत. या शिवाय फार्मसी व्यवसाय: एफआयपी विकास उद्दिष्टे 'सीपीए आणि एएआयपीएस', 'कर्करोग संशोधन: ट्यूमर टार्गेटिंग आणि उपचार' या बाबत नामवंत व्यक्ती, फ्लोरिडा विद्यापीठ, दक्षिण कोरिया, ऑक्सफर्ड विद्यापीठ, यूके, यूएसए, यूएई, दक्षिण आफ्रिका येथील परदेशी वक्ते आणि आयपीसी, गाझियाबाद येथील तज्ञ; सीडीएससीओ, दिल्ली; आयसीटी सीएसआयआर आणि डीआरडीओ येथील तज्ञ मंडळी ऊहापोह करणार आहे. परिषदेचा विशेष भाग म्हणजे फायजर इनोव्हेशन, ग्लोबल आर अँड डी- भारताचा दृष्टीकोन यावर डॉ. शरद गोस्वामी, वरिष्ठ सार्वजनिक व्यवहार संचालक, फायजर द्वारे पॅनेल चर्चेचे आयोजन. परिषदेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एचआर कॉन्क्लेव्ह असून ल्युपिन, अरबिंदो, अल्केम, डॉ. रेड्डी आणि इतर अनेक औषध उद्योगातील सीईओ, एमडी, व्हीपी आणि एचआर प्रमुख पॅनेल चर्चेत भाग घेतील. त्याचप्रमाणे, 21 आणि 22 जानेवारी रोजी एनआयपीईआर मोहाली, हर्बल्स रिसर्च प्रमुख, हिंदुस्थान लीव्हर रिसर्च सेंटर बंगलोर, मर्क एलएस प्रा. लि., सिंडॅक्स फार्मास्युटिकल्स यूएसए, आणि एम्स नागपूरचे डॉक्टर विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. 72 व्या आयपीसी एलओसीमध्ये प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून जावेद अली आणि नितीन मुकेश यांच्या म्युझिकल लाइव्ह कॉन्सर्ट आणि नागपुरातील फुटाळा येथे जगप्रसिद्ध फ्लोटिंग म्युझिकल फाउंटन शो या अंतर्गत होणार आहे. 72वे आयपीसी निश्चितपणे ज्ञानाचा स्रोत ठरेल आणि विविध डोमेनमधील सर्व फार्मसी व्यावसायिकांसाठी फलदायी असणार आहे. आयपीसीच्या स्थानिक आयोजन समितीने 72 व्या भारतीय फार्मास्युटिकल काँग्रेससाठी संपूर्ण फार्मास्युटिकल समुदायाला आमंत्रित केले असून हे आयोजन यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.