Sun Nov 24 11:40:44 IST 2024
नागपूर : बुटीबीरी येथील माया इस्पितळाच्या उद्घाटन सोहळ्याच्या वृत्तसंकलनासाठी गेलेल्या नागपूरच्या पत्रकारांना भेटवस्तू म्हणून चक्क मद्याच्या बॉटल्स देण्यात आल्या. या संपूर्ण घटनाक्रमामागे नागपूरच्या एका पत्रकाराने मध्यस्थ म्हणून आडतची भूमिका साकारली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज बुटीबोरी येथील माया इस्पितळाचा उद्घाटन सोहळा पार पडणार होता. त्यासाठी इस्पितळ प्रशासनाकडून नागपूर टिळक पत्रकार भवन येथून पत्रकारांना कार्यक्रमास्थळी घेऊन जाण्यासाठी चारचाकी वाहनाची व्यवस्था करण्यात आली. अनेक पत्रकार वृत्तसंकलनासाठी गेले. नियोजित वेळी कार्यक्रम पार पडला. मात्र, कार्यक्रम आटपूनही पत्रकारांना अव्यवस्थेला सामोरे जावे लागले. नागपूरच्या एका पत्रकाराला मध्यम समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी ती योग्य पद्धतीने पार पाडली नाही. पत्रकारांशी खोट बोलून वेळ मारून नेण्याचा या महाशयाचा तिथे प्रयत्न सुरूचं होता. पाच वाजतापासून गेलेले पत्रकार नागपूरला परत जाण्यासाठी वाट बघत होते. रात्रीचे नऊ वाजले. तरीदेखील त्यांना भेटवस्तूचे प्रलोभन देऊन थांबविण्यात आले.
भेटवस्तू पॅक होत आहेत. थांबा अश्या थापा मारून मारून रात्रीचे साडे नऊ वाजले. अखेर पत्रकारांचा रोषाला माया इस्पितळचे डॉ. दीपक देवतळे यांना सामोरे जावे लागले. त्यांनी पत्रकारांना भेटवस्तू म्हणून मद्याच्या बॉटल्स दिल्या. याचा पत्रकारांनी विरोध केला. या सगळ्यामागे त्या मध्यम समन्वयकाची भूमिका संशयास्पद आहे, हे विशेष.