नितीन राऊतांच २६ नोव्हेंबर पासून बेमुदत आंदोलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2023-11-24 20:48:25.0
img

नागपूर : उत्तर नागपूरसह शहराचा ग्रामीण परिसर व मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील रुग्णांना उपचाराची सोय व्हावी, यासाठी इंदोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र या संस्थेचे श्रेणीवर्धन करून येथे ६१५ खाटांच्या अतिविशेषोपचार रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली होती. निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार ने रुग्णालय इतरत्र हलविण्याचे षडयंत्र

करुन नागरिकांची फसवणूक केली आहे. हे रुग्णालय उत्तर नागपूरातच बांधण्यात यावे याकरिता उत्तर नागपुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कृती समिती बनविलेली आहे. शुक्रवार ला कामठी रोड वरील पी.डब्लू.एस. महाविद्यालयात सायंकाळी झालेल्या कृती समितीच्या बैठकीत राज्याचे माजी मंत्री व उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत उपस्थित होते. यावेळी बोलतांना रुग्णालयाच्या बांधकामाला राज्य सरकार मुद्दाम उशीर करीत आहे, या सरकारची मंशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय उभारण्याची दिसून येत नाही. शासनाने तात्काळ भूमीपूजन करुन रुग्णालयाचे बांधकाम सुरु करावे अन्यथा लोक आग्रहाखातर मी पण त्यांच्या समवेत उपोषण करणार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समितीला समर्थन दिले. यावेळी डॉ. राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. बैठकीत बोलतांना म्हणालेत की, राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी १४ एप्रिल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कान्व्हेंशन सेंटरच्या लोकार्पण प्रसंगी सदर रुग्णालयाचे बांधकाम करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू इतका काळ लोटूनही यांनी रुग्णालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन केले नाहीत. अगोदर हे रुग्णालय उत्तर नागपूरातून वर्धा रोड किंवा मिहान येथे हलवीण्याचे षडयंत्र राज्यातील सरकारने केले होते. प्रसंगी या बैठकीचे अध्यक्ष माजी उपमहापौर धिरेंद्र चहांदे प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलतांना डॉ. राऊत म्हणालेत महाविकास आघाडी सरकार ने या प्रकल्पाकरिता ११६५.६५ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. तरीही अद्याप शासनाने रुग्णालयाचे बांधकाम अद्याप सुरु केले नाही. यांची मानसिकता फक्त आंबेडकरी जनतेचा वापर करुन घेण्याची आहे. यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या प्रकल्प नको आहे. या अगोदर ही भाजप सरकारने उत्तर नागपुरातील शासकीय अभियांत्रिक महाविद्यालय पडवून नेले. यावेळीही तीच परिस्थिती दिसत आहे. उत्तर नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनाची कर्मभूमी आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या रुग्णालय उत्तर नागपूरात झालेच पाहिजे याकरिता सर्वांनी एकत्रित येऊन आंदोलनाची धार आता पाजळली पाहिजे. मी २६ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या आंदोलनात सहभाग घेणार असल्याचे ही यावेळी डॉ राऊत म्हणालेत. प्रसंगी वेदप्रकाश आर्य, मनोज बंसोड, दिनेश अंडरसहारे, सुरेश पाटील, छाया खोब्रागडे, मुरली मेश्राम, संजय फुलझेले, साहेबराव सिरसाट, वामन सोमकुंवर, बाळू कोसनकर, जगदीश गजभिये, नरेश महाजन, योगेश लांजेवार, प्रमोद जांभूळकर, महेंद्र भांगे, रोहित इरपाचे, मुलंचद मेहर आणि अधीर बागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रसंगी उत्तर नागपूरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संगठनेचे पदाधिकारी, सर्वधार्मिय प्रतिनिधी आणि उत्तर नागपुरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Post