Fri Apr 04 07:05:02 IST 2025
नागपूर : इंदोरा, कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रा समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समिती तर्फे बेमुद्दत जनआंदोलन
सुरु आहे. आज या जनआंदोलनाचा दुसरा दिवस असून आंदोलनात सामील होण्याकरिता आंदोलनाला नागरिक स्वयंस्फूर्तीने सामिल झाल्याचे चित्र आज बघायला मिळाले. त्याच प्रमाणे आज माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, जेष्ठ विचारवंत उत्तम कांबळे, ओबीसी नेते व माजी आमदार अशोक धवड आणि बसपाचे उत्तम शेवळे यांनी भेट देवून कृती समितीच्या आंदोलनाला समर्थन दिले. आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळ पासून मूलचंद मेहर, शेख शहाबुद्दीन, राजेश कोहाड, दीपा गांवडे आणि विणा दरवाडे यांनी आज साखळी उपोषणात सहभाग घेतला. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार सदर रुग्णालय इतरत्र हलविण्याचे षडयंत्र करुन नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आज या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी केले. हे प्रकल्प उत्तर नागपूरातच बांधण्यात यावे व तात्काळ भूमिपूजन करुन बांधकाम करण्याची मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संगठनेनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समिती बनविलेली आहे. यावेळी संजय दुबे, छाया खोब्रागडे, वेदप्रकाश आर्य, बंडोपंत टेम्भूर्णे, दिनेश अंडरसहारे, संघपाल उपरे आणि उमेश बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. बेमुद्दत जनआंदोलनात सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संगठनेचा सहभाग दिसून आला. यावेळी महिला, तरुण वर्ग आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालया बचाव कृती समिती तर्फे बेमुद्दत जनआंदोलनात सकाळी ११ वाजता पासून सायंकाळी ०५ पर्यंत मूलचंद मेहर, शेख शहाबुद्दीन, राजेश कोहाड, दीपा गांवडे आणि विना दरवाडे पूर्ण वेळ साखळी उपोषण केले. यावेळी उपस्थित नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राची प्रस्तावित इमारतीचे चित्रीकरण कृती समितीच्या वतीने दाखविण्यात आले. उद्या जनआंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रजनीगंधा वाघमारे, गोपाल राजवाडे, रमेश अंबाडकर, आशा वासनिक, प्रेमलता बोद्रे आणि सिंधू चारभे साखळी उपोषणात सहभाग घेतील.