हार्दिक व नताशाचा होणार घटस्फोट?, नताशाला किती कोटींची पोटगी द्यावी लागेल

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-05-31 14:47:17.0
img

नवी दिल्ली : हार्दिक पंड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. हार्दिकच्या संपत्तीमधील ७० टक्के रक्कम ही घटस्फोटानंतर नताशाला द्यावी लागू शकते. त्यामुळे घटस्फोटानंतर हार्दिकला नताशाला किती कोटी रुपये द्यावे लागतील, हे आता समोर आले आहे.

हार्दिकच्या नावावर ९१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. या ९१ कोटीपैकी आता जवळपास ६३ कोटी रुपये हार्दिकला नताशाला पोटगी म्हणून द्यावी लागेल, असे म्हटले जात आहे. हा हार्दिकसाठी मोठा धक्का समजला जात आहे. कारण आता हार्दिकने आतापर्यंत ही कमावलेली मिळकत आहे. आता यापुढे तो जास्त काळ खेळणार नाही. त्यामुळे तो जास्त पैसे कमावू शकणार नाही. त्यामुळे हा घटस्फोट हार्दिकसाठी मोठा धक्का ठरू शकतो.

काही दिवसांपूर्वी हार्दिकचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हार्दिक म्हणत होता की, मला जे पैसे मिळतात ते मी आईच्या आणि कुटुंबियांतील अन्य व्यक्तींच्या नावावर करतो. कारण मला माझ्या कमाईतील ५० टक्के हिस्सा भविष्यात अजून कोणाला द्यायचा नाही. हार्दिकच्या डोक्यात ही गोष्ट बोलताना घटस्फोटाचा विचार नक्कीच होता. कारण जेव्हा घटस्फोट घेतला जातो तेव्हाच ५० किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम पोटगी म्हणून द्यावी लागते.

Related Post