सचिन तेंडुलकर होणार BCCI चा पुढचा अध्यक्ष?

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2025-09-12 13:48:44
img

मुंबई : बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी 70 वर्षांची वयोमर्यादा पूर्ण झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. बीसीसीआयच्या कायद्यानुसार कोणताही अधिकारी 70 वर्षांनंतर पदावर राहू शकत नाही. बिन्नी यांनी पद सोडल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र आता सचिनच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करत या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.

सचिन रमेश तेंडुलकर (SRT) स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "सचिन तेंडुलकर यांना बीसीसीआय अध्यक्षपदासाठी विचारात घेतले जात आहे किंवा नामनिर्देशन झाले आहे, अशा काही निराधार बातम्या पसरवल्या जात आहेत. यामध्ये कोणताही तथ्यांश नाही. कृपया अशा अफवांकडे लक्ष देऊ नये."

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये नवे बीसीसीआय अध्यक्ष आणि आयपीएलचे अध्यक्ष यांची निवड होण्याची शक्यता आहे. आयपीएल अध्यक्ष अरुण कुमार धूमल यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना ‘कूलिंग ऑफ पिरियड’ला जावे लागेल. दरम्यान, विद्यमान सचिव देवजीत सैकिया, संयुक्त सचिव रोहन गौंस देसाई आणि कोषाध्यक्ष प्रभतेजसिंग भाटी हे आपल्या पदांवर कायम राहतील, अशी अपेक्षा आहे. राजीव शुक्ला सध्या उपाध्यक्ष असून तेही कोणत्या ना कोणत्या भूमिकेत बीसीसीआयशी जोडलेले राहतील, अशी चर्चा आहे.

Related Post