खासदार क्रीडा महोत्सवाचे उ‌द्घाटन १२ जानेवारीला, खासदार कंगना रणौत यांची उपस्थिती

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2025-01-11 13:26:45.0
img

नागपूर : आणि विदर्भातील खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सातव्या पर्वाला रविवार १२ जानेवारी २०२५ रोजी सुरुवात होत आहे. खासदार कीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत व खासदार, सिने अभिनेत्री कंगना रणीत यांच्या विशेष उपस्थितीत रविवारी १२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता यशवंत स्टेडियम येथे महोत्सवाचा शुभारंभ होईल.

मान्यवर अतिथींच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित केली जाईल. यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण होईल. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सातव्या पर्वाचे आयोजन १२ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या २० दिवसांमध्ये शहरातील ७३ क्रीडांगणांवर ५८ खेळ खेळले जातील. यात विविध ५८ खेळांच्या तब्बल २९०० चमू ६००० ऑफिसियल्स, ८० हजार खेळाडूंचा समावेश असेल. एकूण १३१०० स्पर्धा खेळविण्यात येणार असून यात खेळाडूंना १२३१७ मेडल्स आणि ७६२ ट्रॉफी देण्यात येतील. स्पर्धेतील विजेत्यांना १ कोटी ५० लक्ष रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहेत. रविवारी १२ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता यशवंत स्टेडियम येथून मॅरेथॉन आणि सकाळी ६.३० वाजता युवा दौडला सुरुवात होणार आहे. यानंतर केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व खासदार, सिने अभिनेत्री कंगना रणौत व अन्य मान्यवर अतिथीच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ होईल. मॅरेथॉन पुरुष, महिला आणि १६ वर्षाखालील मुले व मुली या गटामध्ये होणार आहे तर ३ किमी अंतराची युवा दौड सर्वासाठी खुली असणार आहे. युवा दौडमध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धकाला मेडल्स, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट प्रदान करण्यात येणार आहे.

महोत्सवाच्या आयोजनासाठी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी, सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, कोषाध्यक्ष श्री. आशीष मुकीम, श्री. सुधीर दिवे, श्री. नागेश सहारे, डॉ. पद्‌माकर चारमोडे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतिश वडे, सचिन माथने, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत किरपाने, डॉ. सौरभ मोहोड, रमेश भंडारी, प्रकाश चाद्रायण, नवनीतसिंग तुली आदी परिश्रम घेत आहेत.

Related Post