शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज: दिनेश वंजारी

2016-10-20 21:55:15.0
img

नागपूर: पारंपारिक शिक्षणातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळणे अवघड झाले आहे. यामुळे केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेवून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करावी. पारंपारिक शिक्षणासोबतच कौशल्यावर आधारीत व्यवसायाभिमुख शिक्षण द्यावे असे प्रतिपादन श्री संताजी शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दिनेश वंजारी यांनी येथे केले.

सन्मान फाऊंडेशन व संताजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील छत्रपती चौक येथील संताजी महाविद्यालय येथे अायोजित मेळावाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया वंजारी, सन्मान फाऊंडेशनचे अध्यक्ष हर्षल गजेश्वर व मधुकरराव टोपू सेठ हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.दिनेश वंजारी म्हणाले, "विद्यार्थ्यांनी पारंपारिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी आदीचे व्यवसायाभिमुख शिक्षण घ्यावे. शिक्षणपूर्ण झाल्यानंतर रोजगाराचा प्रश्न उद्भविणार नाही."

आजचा विद्यार्थी विविध संसाधनांचा उपयोग करीत असल्याने बहुआयामाचा धनी आहे. तो लवकर कौशल्य प्राप्त करतो. उद्योजकांच्या अपेक्षा सहज पूर्ण करु शकत असल्याच्या डॉ. प्रिया वंजारी म्हणाल्या.यावेळी इतरही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी प्रा. श्रीकांत पाजणकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्रीकांत सोनटक्के यांनी संचालन केले आणि सन्मान फाऊंडेशनचे अध्यक्ष हर्षल गजेश्वर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी उपस्थित होते.

Related Post