Sun Nov 24 23:44:33 IST 2024
नागपूर : 23/11/2023 ला आदिवासी वर्ग तीन संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, उपलेखापाल आदिवासी विकास निरीक्षक, ग्रंथपाल, लिपिक, गृहपाल, अधीक्षक तसेच शिक्षक या पदा संबंधीची जाहिरात निघाली होती. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13/ 12 2023 होती परीक्षा शुल्क हजार रुपये होते.
मार्च किंवा एप्रिल मध्ये परीक्षा होईल असे परीक्षार्थींना वाटायचे परंतु लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षा झाली नाही विभागाच्या मदत कक्षाशी संपर्क केल्यास त्यांचे उत्तर असे होते की संकेतस्थळात स्थळावर माहिती सांगण्यात येईल आदिवासी परीक्षा ही आयबीपीएस च्या माध्यमातून घेण्यात येणार आहे त्यानंतर 11 जून 2024 ला विभागाद्वारे जाहीर प्रगटन करण्यात आले की जाहिरातीमध्ये एसईबीसी या संवर्गाचा जाहिरातीत समावेश करून जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करण्यात येईल परंतु आतापर्यंत पुनश्च बिंदूनावानामावली अद्यावत करून पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही ना परीक्षेचा दिनांक प्रसिद्ध करण्यात आला पदभरतीला स्थगिती देण्यात आलेली आहे अशी जाहीर प्रगटनाद्वारे सांगण्यात आलेले आहे समोर दोन महिन्यांनी विधानसभा निवडणूक लागणार आहे
त्यात अजून आचारसंहितेचा प्रभाव संबंधित विभागाच्या परीक्षेत पडू शकतो त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत संपूर्ण वर्षच निवडणुकीच आहे तर आदिवासीची परीक्षा कधी होईल निकाल कधी लागेल आणि नियुक्ती देखील कधी मिळेल यांसारखे प्रश्न परीक्षा त्यांना भेडसावत आहे संबंधित खात्याचे मंत्र्यांनी याची दखल घेऊन याकडे लक्ष द्यावे