Sun Nov 24 22:41:56 IST 2024
नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी चार ऍफिडेव्हीट घेऊन मिरज येथील समित कदम नावाचा माणूस पाठवला, त्या ऍफिडेव्हीट मध्ये 4 गोष्टी नमूद होत्या १)तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 300 कोटी देशमुखांना वसूल करायला सांगितले.
२) आदित्य ठाकरे यांनी दिशा सालीयन (सुशांतसिंग राजपूत ची पीए) वर बलात्कार करून तिला बाल्कनी तून फेकून दिले. ३) अजित पवार यांनी पार्थ पवार च्या उपस्थितीत देशमुखांना घुटका व्यापाऱ्यांकडून पैसे वसूल करायला सांगितले. ४)अनिल परब यांच्यावर काही आरोप हे चारही कागद अनिल देशमुखांनी ऍफिडेव्हिट करून सही करून द्यावेत नाहीतर तुरुंगात जावे असा दबाव देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांवर आणला. अनिल देशमुखांनी 13 महिने तुरुंगात राहणे पसंत केले पण ते फडणवीसांच्या दबावाला बळी पडले नाहीत असा आरोप प्रा.श्याम मानव यांनी फडणवीसांवर केला. अनिल देशमुखांनी त्याला स्पष्टपणे दुजोरा दिला आणि याबद्दलचे पुरावेसुद्धा माझ्याकडे असल्याचे माध्यमांसमोर सांगितले. या आरोपांमुळे फडणवीस आणि कंपू मध्ये खळबळ उडाली. फडणवीस यावर प्रत्युत्तर देताना माझ्याकडे अनिल देशमुख हे शरद पवार-ठाकरे यांच्याबद्दल काय बोलले याचे पुरावे आहेत असे म्हणाले, पण श्याम मानव व अनिल देशमुखांनी केलेले आरोप खोटे आहेत असे म्हणाले नाहीत. वरून "मी कुणाच्या नादी लागत नाही आणि लागलो तर सोडत नाही", अशी धमकीसुद्धा दिली. विषय होता अनिल देशमुखांवर दबाव आणण्याचा, अनिल देशमुख पवार-ठाकरेंबद्दल काय बोलले हा विषयच नव्हता पण फडणवीस गडबडले आणि नेहमीप्रमाणे त्यांनी विषय भरकटविण्याचा प्रयत्न केला. एकट्याने बाजू सांभाळली जात नाही हे लक्षात आल्यावर बीजेपी आय टी सेल कामाला लागला आणि अनेक युट्युब चॅनल, युट्युब न्यूज चॅनल्स च्या माध्यमातून प्रा.श्याम मानवांची बदनामी सुरू केली. देवेंद्र फडणवीसांवर आरोप होताच नागपूरचे माजी ज्येष्ठ पत्रकार श्री गजानन जानभोर यांना स्वपक्षीयांनीच मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून उपमुख्यमंत्री बनविलेल्या फडणवीसांसारख्या लोकनेत्याला सार्वजनिक जीवनातून उठविण्याचा हा डाव वाटला, इतकंच नव्हे तर श्याम मानव हिंदू विरोधी कसे याचाही साक्षात्कार झाला. म्हणून त्यांनी प्रा.श्याम मानव हे संत गजानन महाराज यांच्याबद्दल 'गजानन महाराज यांना बोलता येत नव्हते' असे म्हणतात तर स्वामी समर्थांबद्दल 'स्वामी समर्थ खोटारडे होते' असे असे म्हणतात हे आरोप केले. हिंदू धर्मावरच टीका बाबांचेच भांडाफोड करतात. इतर धर्मियांच्या विरोधात काहीच करत नाहीत असे आरोप केले आहेत. हे आरोप फडणवीसांवरील मुख्य आरोपांना बगल देण्यासाठी असले तरी त्यांनी केलेले आरोप किती खरे? किती खोटे? हे आपण पडताळून बघुयात. प्रा.श्याम मानव एखाद्या राजकीय पक्षांचा झेंडा घेऊन गजानन महाराज-स्वामी समर्थांवर टीका करत असतील तर ते चूक आहे असेही गजानन जानभोर सदर लेखात म्हणालेत. पहिली गोष्ट जानभोरांनी दिलेल्या दोन्ही व्हिडीओ च्या लिंक अनेक वर्षांपूर्वीच्या आहेत. गजानन महाराजांबद्दलचा व्हिडीओ 4 वर्षांपूर्वीचा तर स्वामी समर्थांबद्दलचा व्हिडीओ 5 वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी प्रा.श्याम मानवांची कुठलीही राजकिय भूमिका नव्हती. त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या 6 महिने आधी राजकिय भूमिका जाहीर केली आणि तशा सभा घेतल्या. त्यामुळे हे साफ खोटं आहे की प्रा.मानव यांनी राजकीय पक्षाचा झेंडा घेऊन संतांबद्दल भूमिका मांडली. 5 वर्षांपूर्वीचे व्हिडीओ आता फडणवीसांवर आरोप झाल्यावर आठवणे याला काय म्हणावे? महत्वाचे म्हणजे जानभोर यांनी दिलेल्या या दोन्ही व्हिडीओत श्याम मानवांनी कुठेच स्वामी समर्थ खोटारडे होते असा शब्द वापरलेला नाही. आणि संत गजानन महाराज यांना बोलता येत नव्हते असे गजानन विजय ग्रंथातील खापर्डे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत दिलेले आहे असे प्रा.मानव म्हणाले, ते त्यांचं स्वत: च मत नाही. यासाठी तसे लिहिणारे खापर्डे यांना दोषी धरायला हवं, पण जानभोर असं खापर्डे यांनी का लिहिलं? असं न विचारता श्याम मानवांनी असं का म्हंटल? म्हणून ओरड करत आहेत. श्याम मानव यांनी स्वामी समर्थांना 'खोटारडे' म्हंटल्याचा साफ खोटा प्रचार करत आहेत. संत गजानन महाराज आणि स्वामी समर्थ या दोन्ही संतांवरील श्याम मानवांचे व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध आहेत, त्यात कुठेच खोटारडे शब्द वापरलेला नाही. उलट त्यात प्रा. मानव असे म्हणतात की, "मी त्यांना बघितलं नाही, त्यांचा अनुभव घेतला नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही." प्रा.श्याम मानव व त्यांच्या सहकाऱ्यांना कायम हिंदू धर्मातीलच अंधश्रद्धा दिसतात, इतर धर्मातील अंधश्रध्दांबद्दल मानव कधीच काही बोललेले नाहीत असाही आरोप जानभोर यांनी केलाय. नागूरचाच शेख फरीद बाबा, बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणारा सोलापूरचा अस्लमबाबा, साताऱ्याच्या दर्ग्या वरचा करमअली, अकोला जिल्ह्यातील तेल्हाऱ्याचा रहीमबाबा, नागपूर जिल्ह्यातील बेला येथील रज्जाक बाबा, बुलडाण्याच्या चिखली येथील वळतीचे (मुस्लिम) बाबा, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी मधील करामत शाह बाबा अशा अनेक बुवाबाबांचा प्रा.श्याम मानव आणि अ.भा.अंनिसने भांडाफोड केला आहे. नागपूरच्या कामठीला मस्जिदच्या वर चांद-ताऱ्याचा चमत्कार थांबवला, अकोला जिल्ह्यातील रेल येथील मशीद ट्रस्ट द्वारे होणारी जनतेची लूट थांबवली, निर्मला माताजी जन्माने ख्रिश्चन आहे पण हिंदू देवी बनून प्रसिद्धी मिळविली त्या निर्मलामाताची जाहीर मुलाखत घेऊन प्रा. श्याम मानवांनी तिचा भांडाफोड केला. मुबई मधील शिवाजी पार्क मध्ये दहा हजार लोकांसमोर रोगमुक्तीचा दावा करणाऱ्या अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी मॉरिस सेलिरो यांच्याविरोधात प्रा. मानव व सहकाऱ्यांनी तक्रार केली, पोलिसांनी सहकार्य न केल्याने कोर्टातून कार्यवाही करण्याचा आदेश आणला व त्यांचा कार्यक्रम बंद पाडला. ख्रिश्चनिटी मध्ये नन्स च कसं शोषण केलं जातं हे वेळोवेळी प्रा.मानवांनी आपल्या भाषणांमधून मांडलं. प्रा. श्याम मानवांनी १९८२ साली जेव्हा अ.भा.अंनिसची स्थापना केली त्यावेळी फक्त एकट्या विदर्भात २०० च्या वर चमत्कार करणारे बुवा-बाबा होते. आज ते नाहीत ही अ.भा.अंनिसच्या कार्यतत्परतेची पावती आहे. अ.भा.अंनिसने आतापर्यंत सर्वच धर्मातील ढोंगी बुवा बाबांचा भांडाफोड केलाय. त्यात नागपूरला प्रार्थनेतून रोगमुक्तीचा दावा करणारे चार विदेशी ख्रिश्चन मिशनरी रेव्ह मार्टिन ब्यूलमान, रेव्ह माईक हाजिग्स, रेव्ह रॉजरब सिस्टर ज्युडी सच व एक भारतीय रेव्ह सतीश रायबोर्डे अशा एकूण पाच लोकांचा जाहीर भांडाफोड करून गुन्हे दाखल केले होते. जगात पहिल्यांदा अशा प्रकरणात कुण्या विदेशी नागरिकांना अटक झाली होती हे विशेष. ह्या गोष्टींवर कुणीच बोलत नाही. या पकडलेल्या बुवा-बाबांवर ड्रग्ज अँड मॅजिक रेमिडीज ऍक्ट 1954 किंवा भादवी कलम ४२०(फसवणुक) नुसार गुन्हे दाखल केल्याने ते लगेच त्यातून सुटून जात. त्यांना कठोर कलमांतर्गत शिक्षा व्हावी, त्यांची सहज सुटका होऊ नये म्हणूनच महाराष्ट्र शासनाचा 'जादूटोणा विरोधी कायदा २०१३' अस्तित्वात आला या कायद्याचा ज्याचा शब्द आणि शब्द प्रा.श्याम मानव यांनी ड्राफ्टिंग करून दिला आहे आणि तो कायदा संमत करण्यासाठी प्रा.मानव यांनी किती आणि काय कष्ट घेतलेत हे गजानन जानभोर यांना चांगलंच माहिती आहे. आता त्या नी वरील मुस्लिम-ख्रिश्चन बुवा-बाबांची नावेसुद्धा पाठ करून घ्यायला हवीत. (शंका असेल म्हणून काही बातम्यांची कात्रणे पोस्ट सोबत जोडत आहे) आसाराम बापूंना अंनिस ने पकडले काय? रामरहीम चा अंनिसने भांडाफोड केलाय का? रामपाल ला अंनिसने अटक करायला लावली काय? या सर्वांविरुद्ध तक्रार करणारे मुस्लिम आहेत काय? आसाराम, रामपाल, रामरहीम ह्यांनी किती मुस्लिमांना फसवलं, किती ख्रिश्चनांच शोषण केलं? वरील सर्व ढोंगी बाबांनी आयुष्यभर करोडो हिंदूंची फसवणूक केलीय. करोडो हिंदूंचे आर्थिक, शारीरिक शोषण केलंय. मग आम्ही त्या निरपराध करोडो हिंदूंची बाजू घ्यायची की दोन-चार ढोंगी हिंदू बुवा-बाबांची? ज्यांची फसगत झालीय त्या करोडो हिंदूंची बाजू कोण घेणार? स्वत: ला कट्टर हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या संघटना या पीडित हिंदूंच्या बाजूने का उभ्या राहत नाहीत? त्या करोडो हिंदूंची बाजू घेतल्यावरसुद्धा अ.भा. अनिस आणि श्याम मानव हिंदुविरोधी कसे? देव धर्माच्या नावाने कोणत्याच ढोंगी बुवा-बाबांनी सामान्यांची फसवणूक करू नये ही या चळवळींची ठाम भूमिका आहे. यासोबतच जानभोर म्हणतात की, प्रा. श्याम मानवांची मते महाविकास आघाडीतील नेत्यांना मान्य आहेत काय? हे त्यांनी सांगावे. पण प्रत्येकाचे प्रत्येकच मत आपल्या सोबत राहणाऱ्यांना मान्य असेलच असे मुळीच नाही. आता हेच बघा ना. 28 जुलै 2023 ला या मनोहर भिडे नामक विकृत व्यक्तीने महात्मा गांधी यांचे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमीनदार होते असे म्हणून राष्ट्रपित्याच्याच आईचे चारित्र्यहनन केले होते. इतकेच नव्हे तर यानंतर हा भिडे महात्मा ज्योतिबा फुलेंना ब्रिटिश सरकारचा एजंट असे संबोधतो. तो म्हणतो, देशात इंग्रजांनी ज्या गांडूना समाजसुधारकांच्या पदव्या बहाल केल्या, फुलेही त्या समाजसुधारक नावाच्या भडव्यांच्याच यादीतले होते. उत्तर प्रदेशात भारतप्रसाद मिश्रा, बंगालमध्ये राजा राममोहन रॉय, तामिळनाडूमध्ये रामस्वामी नायकर व महाराष्ट्रात महात्मा फुले या सगळ्यांच्या ढूंगणावर देशद्रोहाचे शिक्के आहेत. या सर्व हिंदू महापुरुषांबद्दल इतकी घाण वक्तव्ये करणाऱ्या भिडे ला देवेंद्र फडणवीस भर विधानसभेत 'आमचे गुरुजी' म्हणतात. त्याच फडणवीसांसोबत जानभोर साहेब तुम्ही काम करता पण आम्हाला विश्वास आहे की भिडे ची ही मते आपल्याला कदापि मान्य असू शकत नाहीत. जानभोर साहेब तुम्ही प्रा. मानवांना नवनीत रानांच्या हनुमान चालीसा प्रकरणावर का बोलले नाही म्हणता, स्वतः ला पाठ नसलेली हनुमान चालीसा म्हणण्यासाठी राणांना मुख्यमंत्र्यांने घरात येऊ दिलं नाही हे तुम्हाला दिसलं पण आपल्यावर झालेल्या अत्याचारा विरोधात न्याय मागण्यासाठी साक्षी मलिक-विणेश फोगाट या हिंदू मुलींना मैदानातही आंदोलन करू दिलं नाही, रस्त्यावरून फरफटत नेलं हे दिसलं नाही? आपल्या मागण्या मागण्यासाठी शेतकऱ्यांना कितीतरी महिन्यांपासून स्वतःच्याच देशाच्या राजधानीत घुसू दिले जात नाही हे तुम्हाला दिसत नाही? तुम्ही संतांचा अपमान झाला म्हणता पण 16 डिसेंबर 2021 च्या रात्री कर्नाटकातील बेंगळुरू शहरात सदाशिव नगर येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर काही कर्नाटकी विकृतांनी शाई ओतली. त्यावर कर्नाटकच्या भाजप सरकारचे तत्कालिन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणतात, शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना ही साधी गोष्ट आहे. त्यावर एवढा गदारोळ कशाला? याविरुद्ध महाराष्ट्रातील एकही भाजपचा किंवा आरएसएसचा नेता बोलला नाही. 13 फेब्रुवारी 2003 या दिवशी ?शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया? हे इंग्रजी पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलं. त्याचे लेखक होते, अमेरिकन इतिहास अभ्यासक जेम्स लेन. शिवाजी महाराजांच्या जीवनाची माहिती देणार्या या पुस्तकात जिजाऊंबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आला होता. त्याविरोधात आरएसएस, भाजप आणि इतर कट्टरवादी संघटनांपैकी कुणीच समोर आलं नाही. अहमदनगरचा भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने एका महानगर पालिकेच्या कर्मचार्याशी बोलताना छत्रपती शिवरायांबद्दल अतिशय अपमानास्पद विधान केलं होतं. परंतु त्याच्या विरोधात हे कट्टरवादी बोलले नाहीत. औरंगाबाद येथे पार पडलेल्या समर्थ साहित्य संमेलनाचे उद्घाटक असणार्या राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे वक्तव्य केले होते. याच भगतसिंग कोश्यारी यांनी 19 नोव्हेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षान्त समारंभात पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद विधान केले, 'शिवाजी हे जुने आदर्श झाले, नवीन आदर्श नितीन गडकरी आहेत' असं ते विकृत विधान आहे. ह्याच विकृत मानसिकतेच्या राज्यपालांनी 14 फेब्रुवारीला 2022 ला पुण्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण समारंभात भाषण करताना 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं लग्न 10 व्या वर्षी झालं होतं. तेव्हा त्यांच्या पतीचं वय 13 वर्ष होतं. त्यामुळे कल्पना करा की, इतक्या लहान वयात एक मुलगा आणि मुलगी लग्नानंतर काय विचार करत असतील?' असे सावित्रीबाई आणि ज्योतिबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, ह्या सर्व हिंदू महापुरुषांचा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अपमान केल्यावर सुद्धा फडणवीस, तुम्ही आणि भाजप-संघाचे नेते-कार्यकर्ते का गप्प होतात? ज्यांच्यामुळे आज देवळात देव आहे म्हणतात त्याच छत्रपती शिवरायांचा वारंवार खालच्या थराला जाऊन अपमान होतो मग हे हिंदू धर्माचे ठेकेदार गप्प का? असा प्रश्न आपण त्यांना का विचारत नाही? कोपर्डीच्या घटनेवर श्याम मानव वर्ध्याच्या सभेत बोलले होते पण आपल्याला ते माहिती नसेल. पण अंतरावली सराटी याठिकाणी मराठा समाजाच्या गरीब बायका-पोरांवर, शांततेने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर फडणवीसांच्या गृहखात्याने अमानुष लाठीमार केला तेव्हा तुम्ही कुठे होतात? महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आळंदीच्या वारीत हिंदू वारकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला तेव्हा तुम्ही कुठे होतात? हिंदूंच्या केदारनाथ मंदिरातलं दोनशे किलो सोन्याचं पितळ झालं, तरी हिंदू गप्प का? अयोध्येतील राम मंदिर खरेदीत अनेक कोटींचे घोटाळे झाले, राम मंदिर गळतय, अयोध्येच्या विकासासाठी हजारो कोटी एकाच पाण्यात वाहून गेले तरी आपल्यासारखे हिंदू गप्प का? का तुम्ही अस्वस्थ झाला नाहीत? या देशात 80% हिंदू आहेत, 14.5% मुस्लिम आणि 5.5% इतर सर्व धर्म. मग इथे गॅस सिलिंडर जेव्हा 1100 रुपये होते तेव्हा त्याचा सर्वात मोठा फटका 80% हिंदूंना बसतो, पेट्रोल-डिझेल, किराणा सर्वच महागाईचा फटका हिंदूंना बसतोय. बेरोजगारी इतकी वाढली की त्याचा आकडा देणे सरकारने बंद केले यात सर्वात जास्त हिंदूच मुलं बेरोजगार झाली आहेत. ठाण्यातील हिंदू मंदिरात हिंदू स्त्रीवर हिंदू पुजारीच बलात्कार करत आहेत असे हिंदूंचे हाल तर मोगलांच्या काळातही नव्हते, पण फडणवीस, त्यांचं गृहखातं आणि तुम्ही सर्वच गप्प आहात. अशावेळी तुमचं हिंदुत्व कुठे जातं?
अब्दुल सत्तार म्हणतात 'भिकरचोट सुप्रिया सुळे', चंद्रकांत पाटील म्हणतात 'कुठं आहे तो नाना पटोल्या', नितेश राणे म्हणतात 'बायल्या उद्धव ठाकरे', निलेश राणे म्हणतात 'त्याच्या आईला घोडा लावतो', सुधीर मुनगंटीवार म्हणतात 'सख्ख्या भावा बहिणीला एकाच खाटेवर झोपवणारे हे काँग्रेसवाले' हे सगळे महायुतीचे नेते जाहीरपणे ह्या भाषेत बोलतात तर खासगीत काय काय बोलत असतील? भाषेची पातळी तर राहिलीच नाही पण देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी पार मातीत घातली असताना जानभोर साहेब आपण गप्प का? राज्यात इतके फोडफाडीचे राजकारण झाले, स्वतः फडणवीस म्हणालेत की मीच ठाकरे सरकार पाडले. अनिल देशमुखांवर इडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स च्या 100 पेक्षा जास्त धाडी पाडण्यात आल्या. परमबीर सिंग ने कोर्टात प्रतिज्ञापत्र दिले की मी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांबद्दल माझ्याकडे कोणताही पुरावा नाही तरी 4 खोटे ऍफिडेव्हीट करून दिले नाही म्हणून देशमुखांना 14 महिने तुरुंगात पाठविण्यात आलं. संजय राऊतांना तीन महिन्यानंतर तुरूंगातून सोडताना कोर्ट म्हणत की संजय राऊतांची अटक बेकायदा होती. अजित पवार-अशोक चव्हाण सारख्या नेत्यांना तुरुंगात पाठविण्याची भाषा करणाऱ्या फडणवीसांनी त्यांनाच सोबत घेऊन सन्मानाची पदे दिली हे सर्व बघून आपण अजिबात अस्वस्थ होत नाही? याबद्दल एकही शब्द आपल्याला बोलावासा वाटत नाही? मानव हे सामाजिक कार्यकर्ते राहिले नाहीत ते महाविकास आघाडीचे प्रचार प्रवक्ते झालेत, कारण ते सरकार विरोधात सभा घेत आहेत असाही जानभोर आरोप करतात. मग आणीबाणी च्या वेळी जेव्हा श्याम मानव इंदिरा गांधींच्या विरोधात प्रचार करीत होते, त्यासाठी तुरुंगात गेले त्यावेळी ते जनसंघाचे-आरएसएस चे प्रचार प्रवक्ते होते काय? ज्या काँग्रेसच्या विरोधात त्यांनी त्यावेळी प्रचार केला त्या काँग्रेसलाही तसे कधीच वाटले नाही. 2013 ला अण्णा हजारेंनी काँग्रेस सरकार विरोधात मोठे आंदोलन केले म्हणजे ते भाजप-संघाचे प्रचार प्रवक्ते होते काय? देशातील संविधान धोक्यात असेल, सरकार जर मनमानी वागत असेल, सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होत असेल त्यांच्या व्यथा जर कुण्या सामाजिक कार्यकर्त्याने मांडल्या तर काय तो विरोधी पक्षाचा प्रवक्ता होतो? 15-20 वर्षांपासून तुम्ही स्वत: श्याम मानव यांना ओळखता त्यांना विकत घेण्याची कुण्या नेत्यांची किंवा पक्षाची ताकद आहे काय? हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे माहिती आहे. जानभोर पुढे म्हणालेत की जादूटोणा विरोधी कायद्याला फडणवीसांनी बळ दिले. या कायद्याला प्रत्येकच पक्षातील नेत्यांनी मदत केली आहे, त्यात काँग्रेसचे शिवाजीराव मोघे-वसंत पुरके असतील, शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादीचे अजित पवार असतील सर्वांनीच एकदिलाने मदत केली. राहिला प्रश्न त्या कायद्याच्या अंमलबजावणीचा आणि निधीचा तर जानभोर साहेब तुम्ही माहिती घ्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर जादुटोणा विरोधी कायदा प्रसार- प्रचार पूर्णपणे थांबला. एकही पाऊल पुढे गेला नाही. आधीच्या सरकारने गठीत केलेली कायदा प्रसार प्रचार अंमलबजावणी समिती (ज्यामध्ये प्रा.श्याम मानव सहध्यक्ष होते) फक्त कागदावर होती. वर्षभरात शासनाने एकही सभा घेतली नाही. जादुटोणा विरोधी कायदा प्रसार- प्रचार आणि अंमलबजावणी साठी मंजूर करण्यात आलेला निधी खर्च केला नाही. ठाकरे सरकार असताना सुरू असलेलं कायद्याच्या प्रचार-प्रसाराचं काम शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच तातडीने थांबविण्यात आलं. भाजपला जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार-प्रसार आणि अंमलबजावणी का नको हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. आणि जानभोर साहेब शासनाने निधी जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी दिला होता, प्रा.मानवांना घर बांधण्यासाठी नाही. समितीच्या खात्यात पैसे देतो बोलल्यावर सुद्धा प्रा.मानव यांनी अजित पवार यांना स्पष्ट नकार दिला आणि झालेल्या उपक्रम-कार्यक्रमांचा खर्च सामाजिक न्याय विभागा मार्फत करण्यात यावा असे सांगितले. असा कोण व्यक्ती आज करू शकतो? कुणीतरी निधी दिला म्हणून त्याच्या ताटाखालचं मांजर होऊन जगणाऱ्यांपैकी प्रा.मानव आहेत? नैतिकता पाळणारी आणि तत्वांसाठी जगणारी माणसे भाजप-संघात नसली तरी या देशात निश्चितच आहेत याची आपण कृपया खात्री बाळगावी. पूर्वापारपासून सर्व संत- महात्मे यांनी कायम धर्मातील वाईट आणि खोट्या गोष्टींना विरोध केला. 'योग याग विधी, येणे नोहे सिद्धी', वायाची उपाधी, दंभधर्म' म्हणत संत ज्ञानेश्वर माउलींनी कुणी कितीही तपश्चर्या केली, कितीही योग, होम, हवन केले तरी कधीच कुणाला सिद्धी प्राप्त होत नाही, कुणी कधीच चमत्कार करू शकत नाही, ह्या सर्व खोट्या गोष्टी (दंभधर्म) आहेत हे सांगितले.संत तुकोबारायांनी 'वाजे पाऊल आपले । म्हणे मागे कोण आले । काही वाटे आकस्मिक । म्हणे मागे आले भूत । 'या अभंगातून भूत-प्रेत हे फक्त माणसाचे भास आहेत', या जगात भूत नसते हे सांगितले. हेच संतांचे अपूर्ण राहिलेले कार्य पुढे नेण्याचे कार्य प्रा.श्याम मानव व अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती अखंडपणे करत आहे. त्यामुळे प्रा.श्याम मानव कधीच कुणाच्या भावना दुखावतील असे बोलत नाहीत. प्रा.श्याम मानव आणि अ.भा.अंनिसने आजपर्यंत सर्वधर्मीय बुवाबाबांना पकडून करोडो नागरिकांना (ज्यात बहुतांश हिंदूच) फसवणुकीपासून वाचवून धर्म कार्यास कायम हातभारच लावला आहे हे आपण केव्हा लक्षात घेणार आहात? श्री गजानन जानभोर सर आपल्याबद्दल आदर आहेच. पण आपण आपली तत्वे-विचार गहाण ठेऊन अतिशय बिनबुडाचे आरोप प्रा.मानवांसारख्या तत्ववादी व्यक्तीवर कराल तर आम्हाला सुद्धा आपली तत्व आणि विचार जपत त्यांची उत्तरे देणे अनिवार्य आहे. या वरील सर्व प्रश्नांवर आपण भाजप-युतीच्या नेत्यांना धारेवर धराल अशी अपेक्षा बाळगण्यात मला तरी काही अर्थ वाटत नाही.. देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंसोबत त्यांचा मुलगा आदित्य अडकावा, अजित पवारांसोबत त्यांचा मुलगा पार्थ अडकावा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करूच शकतात हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलीच कल्पना आहे. हीच पाळी उलटून आपल्यावर सुद्धा येऊ शकते याचा विचार त्यांनी असं वागताना केला पाहिजे. आज महाराष्ट्राचं राजकारण गढूळ करणाऱ्या देवेन्द्र फडणवीसांवर प्रा.श्याम मानव आणि अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांचा विषय भरकटविण्यासाठी तुम्ही धार्मिकतेकडे कितीही वळवलात तरी देवेंद्र फडनवीसांना ह्या गंभीर आरोपांची उत्तरे द्यावीच लागतील आणि त्याचे परिणामही भोगावे लागतील कारण ही महाराष्ट्राची जनता आहे, तिला विश्वासघात सहन होत नाही, इथे मोठं मोठ्या शाह्या टिकल्या नाहीत तिथे हे सुडाचं आणि द्वेषाचं नीच राजकारण करणारे फडणवीसांसारखे धूर्त राजकारणी किस खेत की मुली? ---------------- लेखक : चंद्रकांत झटाले, अकोला 7769886666