Fri Apr 04 07:01:07 IST 2025
मुंबई : ठाकरे गटात पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत असल्याचं नीलन गोऱ्हे म्हणाल्या होत्या. यावर ठाकरे गटाचे आक्रमक नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. नीलम गोऱ्हे या निर्लज्ज आणि नमकहराम बाई असल्याचं राऊत म्हणाले.
नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि नमकहराम बाई आहे. हा शब्द कापू नका, दोन्ही शब्द असंसदीय नाहीयेत. साहित्य संमेलनामध्ये मराठी संस्कती, साहित्य, मराठी भाषा आणि विस्तार यावर चर्चा झाला पाहिजे. देशाच्या राजधानीत महाराष्ट्रातील नेत्यांवर राजकीय चिखलफे करण्यासाठी भरवलं का? साहित्य महामंडळाकडे खंडणी घेऊन संमेलन भरवताय, सरकारने दोन कोटी रूपये दिले की त्यातले २५ लाख काढून घ्यायचे आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायची. कार्यक्रम हे महामंडळ ठरवतात आणि आयोजक हे सतरंज्या उचलायला असतात. उषा तांबे यांनी कार्यक्रमपत्रिका भरवली, ज्यांचे पतीराज हे PWD सेक्रेटरी होते जे सर्वात भ्रष्ट खातं.
नीलम गोऱ्हे यांचे कालचे वक्तव्य ही त्यांची विकृती आहे. मला आठवतंय बाळासाहेब ठाकरे म्हणाले ही कोण बाई आणली? सुरुवातीला बाळासाहेबांनी प्रश्न केला ही कुठलं ध्यान पक्षात आणलंय जे आयुष्यभर शिव्या घालणार, पण काही लोकांच्या मर्जीखातर आल्या चार वेळा आमदार झाल्या. जाताना ताटामध्ये घाण करून गेल्याचं संजय राऊत म्हणाले. पुणे महानगरपालिकेमध्ये अशोक हर्नोळ म्हणून आमचे गटनेते होते, त्यांची मुलाखत घ्या मग हे मर्सडीज प्रकरण काय आहे त्यांना कळले. नाशिकला माजी महापौर आणि स्थानिक गटनेते त्यांना तिकिट देण्यासाठी या बाईंने किती पैसे घेतले होते, त्यांनाच जावून विचारा. मी रेकॉर्डवर सांगतोय ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे. त्याने या बाईकडून पैसे कसे वसूल केले त्यांचटी मुलाखत घ्या मी आणखी नावे सांगेल. तुम्ही कोणावर थुंकताय, बाळासाहेबांनी कतृत्त्वावर आमदा केलं?. बाळासाहेब अशा घाणेरड्या लोकांना आमदार करत नाहीत. आम्ही सोडून गेलो काही कारण असतील पण अशी विधाने करता मातोश्रीबाबतीत, ज्यांनी तुम्हाला चारवेळा आमदार केल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. दरम्यान, मराठी साहित्य महामंडळाने माफा मागितली पाहिजे. ज्या कोणी उषा तांबे बाई आहेत त्या मला माहित नाही. त्यांचं साहित्यात का, योगदान आहे मला माहिती नाही, त्यांनी माफी मागायला हवी. मला नियम सांगू का मी २४ वर्ष राज्यसभेवर आहे. हक्कभंग वगरे मला धमक्या नका देऊत, तुरूंग वगरे आमचं सर्व काही झालं असल्याचं संजय राऊत म्हणाले.