नागपूर अतिवृष्टीचा मनपा व तलाठ्याचा खोटा अहवाल; जाटतरोडी, रामबाग, इमामवाडा व इंदिरानगरातील घरात शिरले पाणी

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-08-02 23:23:30.0
img

नागपूर : अतिवृष्टीमुळे जाटतरोडी, रामबाग, इमामवाडा व इंदिरानगरातील घरात पाणी शिरले, नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. मनपाचे अभियंता आणि तलाठी यांनी प्रत्यक्ष पंचनामे केले नाहीत. खोटे पंचनामे करून अहवाल सादर केला, असा आरोप आक्रमण संघटनेने केला असून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशीही मागणी करण्यात आली.

आक्रमण युवक संघटनेच्या वतीने मनपा उप -आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. शनिवार २०/७ /०२४ रोजी मुसळधार पाऊस झाला. इमामवाडा रामबाग इंदिरानगर जाटतरोडी दक्षिण पश्चिम नागपूर क्षेत्रामध्ये पाऊस पडला. त्यामूळे टीव्ही वॉर्ड कडून जाणारा मेडिकल नाला सरळ नाग नदी कडे मिळतो. पुराच्या पाण्यामुळे हा नाला फुटल्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले. तीन ते चार फूट पाणी घरात गेल्यामुळे संपूर्ण वस्तूची हानी झालेली होती. त्यामध्ये फर्निचर, टीव्ही, पुस्तके कागदपत्रे, सोफा, दीवान ,कपडे ,इत्यादींची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याची तपासणी करिता व पंचनामे करिता नागपूर महानगर पालिके तर्फे कुठलाही कर्मचारी किंवा इंजिनिअर या क्षेत्रामध्ये आले नाही किंवा साधी पाहणी सुद्धा केली नाही. परंतु पीडीत नागरिकांनी आक्रमण युवक संघटनेकडे धाव घेतली, तेव्हा माननीय कलेक्टर साहेब तहसीलदार यांना निवेदन दिले होते. परंतु निवेदन देऊनही कर्मचारी पीडित ग्रस्त क्षेत्रामध्ये पाहणी करिता आले नाही. आणि नंतर पुन्हा एकदा तहसील कार्यालयात गेल्यावर NMC कर्मचाऱ्यांनी पाहणी झाल्याचे अहवाल तहसील कार्यालय सादर केले. जेव्हा की नागरिकांच्या म्हणण्यानुसार कुठलाही कर्मचारी वसाहतीमध्ये नागरिकांच्या समस्या किंवा पंचनामे करण्याकरिता आलेला नव्हता असा नागरिकांचा आरोप आहे आक्रमणने या संपूर्ण पीडित नागरिकांची समस्या समजून घेऊन काल मनपा आयुक्त माननीय चौधरी साहेबांना निवेदन देण्यात आले. सरकारची आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या NMC इंजिनिअर संजय मलिक व संबंधित तलाठी यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे,

व या क्षेत्रातल्या तत्काळ पंचनामे करून पीडित परिवारांना आर्थिक मदत देण्यात यावी. असे न झाल्यास आक्रमण युवक संघटने तर्फे मनपा आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा आक्रमण युवा संघटने तर्फे मनपा आयुक्त यांना देण्यात आला. यावेळी निवेदन देताना आक्रमन चे जिल्हाध्यक्ष ओपुल तामगाडगे, जिल्हा संघटक विशाल बंसोड, जिल्हा संघटक धनराज हाडके, जिल्हा संघटक दिक्षा चौरे, जिल्हा संघटक रोशन ठवरे, जिल्हा महासचिव आतिश संभरकर, जिला सचिव सूरज पुरानीक, पंकज नाखले, शहर अध्यक्ष मुस्तरी वारसी, शहर सचिव अश्विन पाटिल, जिल्हा सचिव अजय गायकवाड, साक्षी मेश्राम, प्रज्ञा गणविर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Post