महायुतीची 'लाडकी बहिण', तर काँग्रेसची 'महालक्ष्मी' योजना

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-08-13 00:09:17.0
img

मुंबई : सत्ताधारी महायुती सरकारनं अनेक योजना जाहीर केल्या असल्या तरीही सध्या सर्वात जास्त चर्चा होतेय ती लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana). तर काँग्रेसचं सरकार आल्यास महिलांना जास्त पैसे देणारी महालक्ष्मी योजना (Mahalaxmi Yojana) सुरू करू, असं आश्वासन आता नाना पटोलेंनी दिलंय.

लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसनं (Congress) जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजनेची घोषणा केली होती. तर महायुतीनं मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात लाडकी बहीण योजना राबवण्यास सुरूवात केलीय. महालक्ष्मी योजनेत महिलांना वार्षिक 1 लाख रु. देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. कुटुंबातील सर्वात वयस्कर महिलेच्या खात्यात रक्कम जमा होणार. प्रत्येक वर्षाला योजनेचा आढावाही घेण्यात येणार. ज्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचे कुटुंबीय एकटे पडले, ज्या महिलेचा कुंकू पुसले गेले ती तुमची बहीण नव्हती का? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने केंद्रात आमचे सरकार आले असते तर महिलांना दर महिन्याला साडेआठ हजार मिळाले असते, असं काँग्रेसने म्हटलंय. स्वार्थासाठी लाडकी बहीण योजना सुरुय, ही आमची योजना आहे आमचे सरकार आल्यावर जास्त पैसे देऊन ही योजना सुरू ठेवू असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलंय.

तर लाडक्या बहीण योजनेत महिन्याला 1,500 रु. दिले जाणार आहेत. योजनेसाठी सरकारकडून 46 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या नाहीत. या योजनांची तयारी गेल्या आठ दहा महिन्यांपासून सुरू होती, निवडणुका आणि योजना याची आम्ही सांगड घालत नाही. विकास आणि कल्याण याची आम्ही सागंड घालतो असं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजनांमुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागलं आहे. त्यांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. त्यामुळे 'बहिण लाडकी आणि विरोधकांना भरली धडकी' असा प्रकार झाल्याचा टोला मुक्यमंत्र्यांनी लगावला आहे. कोविडमध्ये यांनी तोंडातला घास हिसकावला. खिचडी हिसकवली. आता लाडकी बहिण आणि भावाच्या तोंडाचा घास हिसकावण्याचा प्रयतन करत असाल तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. त्यामुळे मी माझ्या बहिणींना नेहमी सांगतो या कपटी सावत्र भावापासून सावध रहा असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं राजकीय वातावरण तापलंय. येत्या रक्षाबंधनाला लाडकी बहीण योजनेचं अनुदान महिलांच्या खात्यात जमा होणाराय. त्यामुळंच लाडकी बहीण योजनेवरून राजकारण रंगलं नसतं, तरच नवल...

Related Post