Fri Apr 04 06:54:46 IST 2025
नागपूर : गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या भीम शाहीर प्रदीप कडवे यांच्या जाहीर सत्कार, रामटेक तालुक्यातील मनसर येथील रामधाम येथे आपल्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केल्याबद्दल रामटेक तालुक्यातील किरणापुर काचुरवाही, येथील युवा प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बागवान कडबे यांच्या रामधामचे संस्थापक पर्यटन मित्र चंद्रपाल चौक से यांनी जाहीर सत्कार केला,
श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी रामधाम येथे बाबा बर्फानी चे कपाट भक्तगणांच्या दर्शनासाठी उघडण्यात आले, याप्रसंगी तालुक्यातील किरणापुर येथील रहिवासी प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बागवान कडबे यांनी आपल्या गीतामधून जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे महती सांगून उपस्थि ता चे समाज प्रबोधन केले, याबद्दल पर्यटन मित्र चंद्रपाल चौक से यांनी भीम शाहीर प्रदीप बागवान कडबे यांच्या सत्कार केला,
कार्यक्रमाला गायिका अर्चना मोटघरे, ज्योत्स्ना मेश्राम, स्वाती वाघमारे, दीक्षा चव्हाण, वर्षा शेंडे, वंदना महेश कर, सपना ढेकले, गायिका सुकन्या थाटकर, गीता पाठक, वंदना लुगे, सुनिता गुरुदे, गायिका संगीता गोंडाणे, भिमशाहिर प्रदीप कडबे, उत्कर्ष कड बे, निधी कड बे, यादी सह भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते,