Fri Apr 04 06:55:32 IST 2025
नागपूर : शालेय शिक्षण विभाग अंतर्गत मागील काही काळात अंशतः अनुदानित वर आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय शिक्षकांना टप्पा वाढ करण्याचा निर्णय शासन स्तरावर प्रलंबित असून 20%, 40% व त्या पुढील टप्पा वाढ राज्यातील शिक्षकांना लवकरात लवकर लागू व्हावा याकरिता नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री अभिजीत वंजारी यांनी शालेय शिक्षण मंत्री ना. श्री दीपक केसरकर साहेब यांच्या मंत्रालयीन दालनात भेट घेतली.
त्यावेळी शालेय शिक्षण उपसचिव समीर सावंत हेही उपस्थित होते. उप सचिव यांच्या माहितीनुसार शिक्षण आयुक्त कार्यालयातून टप्पा वाढी करिता पात्र असलेल्या शिक्षकांची यादी अहवाला सह मागविण्यात आला आहे
त्यावर माननीय मंत्री महोदय दीपक केसरकर यांनी आश्वासन दिले की आयुक्तालया मार्फत यादीसह अचूक अहवाल आल्यानंतर कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून टप्पा वाढचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल.