नागपुरात खाद्यप्रेमींसाठी 'सावजी फूड फेस्टिव्हल', मेट्रो प्रवाशांसाठी ऑफर

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-12-25 07:55:24.0
img

नागपूर : वाघमारे मसाले आणि सुप्रसिद्ध मास्टर शेफ विष्णू मनोहर तर्फे आयोजित सावजी फूड फेस्टिवल पुन्हा एकदा आपल्या भेटीला नागपुरात आला आहे. २४ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत, सायंकाळी ६ ते १० या वेळेत, अलंकार टॉकीज चौकाजवळील इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स येथे नागपूरकरांना सावजी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.

फेस्टिव्हल मध्ये सावजी चिकन, मटका रोटी, किमा-कलेजी यांसारख्या पारंपरिक आणि स्वादिष्ट सावजी व्यंजनांसह व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांचीही रेलचेल असेल. यावर्षी फेस्टिवलमध्ये एक विशेष आकर्षण म्हणजे नागपूर महा मेट्रोमार्फत प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी जेवणाच्या कूपन वर 25 रुपये सवलत दिली जाणार आहे. नागपूर महा मेट्रोने ही घोषणा आज उद्घाटन प्रसंगी केल्यामुळे खाद्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सावजी खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी आणि अस्सल मसाल्यांचे चविष्ट पदार्थ चाखण्यासाठी या फूड फेस्टिवलला नक्की भेट द्या. असे आवाहन विठोबा दंत मंजन विठोबा हेल्थ केअर चे प्रमुख कार्तिक शेंडे यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमाचे स्पॉन्सर आय. बी. ग्रूप. , गो गॅस. लजिज. आणि महाचाहाचे आभार विष्णू मनोहर यांनी मानले.

Related Post