Fri Jul 04 08:32:37 IST 2025
नागपूर : मॅक्स हॉस्पिटल, नागपूर यांनी अलीकडेच मूव्हमेंट डिसऑर्डर क्लिनिक आणि स्ट्रोक युनिटचे उदघाट्न केले आहे.
हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल असून एकाच ठिकाणी न्यूरोलॉजिकल उपचारांची सर्व सुविधा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे. ही खास सुविधा एक प्रादेशिक उत्कृष्टता केंद्र (रिजनल सेंटर ऑफ एक्सेलेन्स) ठरण्याची शक्यता असून, जटिल न्यूरोलॉजिकल आजारांसाठी संपूर्ण आणि बहुवैद्यकीय सेवा प्रदान करेल. नागपूरमधील या केंद्राचे स्थान धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून केवळ नागपूरकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि आजूबाजूच्या भागातील लोकांसाठीही आरोग्य सेवा सहज उपलब्ध होऊ शकणार आहे. या क्लिनिकला पूरक ठरणारी स्ट्रोक युनिट मॅक्स हॉस्पिटलमध्ये 24/7 कार्यरत राहील आणि ऍक्युट स्ट्रोक केअर, रॅपिड इमेजिंग, थ्रॉम्बोलिसिस, परक्युटेनियस मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी व स्ट्रोकनंतरची पुनर्वसन सेवा (रिहॅबीलीटेशन) देईल. भारतात स्ट्रोक हा अपंगत्व व मृत्यूमागील मोठे कारण बनत असल्याने, हे युनिट वेळेवर हस्तक्षेप (ईलाज) करून रुग्णांचे प्राण वाचविणे आणि सुधारित परिणाम साधण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. डॉ. केतन चतुर्वेदी, डायरेक्टर, न्यूरोलॉजी, मॅक्स हॉस्पिटल नागपूर म्हणाले, "क्लिनिकल कौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांच्या समन्वयातून आम्ही एक डेडिकेटेड सेंटर ऑफ एक्सेलेन्स स्थापन करत आहोत, जे पार्किन्सन्स डिसीज, डिस्टोनिया, ट्रेमर्स, टिक्स आणि अन्य हालचाली (मूव्हमेंट) संबंधित आजारांचे निदान आणि उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करेल. आमचे उद्दिष्ट हे रुग्णांना वेळीच अचूक निदान आणि वैयक्तिक उपचार योजना उपलब्ध करून देणे आहे जे आमच्या न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, फिजिओथेरपिस्ट आणि स्पीच अँड ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांच्या बहुवैद्यकीय टीममार्फत दिले जाईल." डॉ. अभिषेक वानकर, सीनियर कन्सल्टंट, म्हणाले, "न्यूरोलॉजी टीममध्ये माझे कौशल्य देण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान आहे. मूव्हमेंट डिसऑर्डर्ससाठी केवळ सर्जरी पुरेशी नसते, तर त्यासाठी एक सूक्ष्म आणि अत्यंत विशेष उपचारपद्धती आवश्यक असते. या क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही अचूक निदान, ऍडव्हान्स थेरपीज आणि रुग्णांना लॉंग टर्म सपोर्ट देऊ इच्छितो, जे अनेक वर्षांपासून असे उपचार शोधत होते. आम्ही डीप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरीसारख्या प्रगत उपचारांसह संपूर्ण सेवा देण्याचा उद्देश ठेवला आहे."
मॅक्स हॉस्पिटलच्या मूव्हमेंट डिसऑर्डर क्लिनिकला आपल्या तज्ञ न्यूरोसाइन्स टीमचा अभिमान आहे, जी रुग्णांसाठी सर्वसमावेशक आणि अत्याधुनिक उपचार सेवा देण्यासाठी समर्पित आहे. आमच्या टीममध्ये उच्च कौशल्य असलेले न्यूरो फिजिशियन डॉ. केतन चतुर्वेदी, डॉ. ललित महाजन, डॉ. निखिल डोंगरे आणि डॉ. अभिषेक वानखेडे यांचा समावेश आहे. त्यांच्या तज्ज्ञतेला पूरक ठरणारे आमचे अनुभवी न्यूरोसर्जन डॉ. आदित्य अटल आणि डॉ. हुसेन भट्टी आहेत. जे प्रगत शस्त्रक्रियेत प्रवीण आहेत. आमच्या बहुवैद्यकीय दृष्टिकोनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे क्रिटिकल केअर तज्ञ डॉ. संजय कृपलानी, जे गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये संपूर्ण देखरेख सुनिश्चित करतात. आणि आपत्कालीन सेवा प्रमुख डॉ. व्ही. निरंजनिनी, जे तात्काळ आणि अखंड सेवा पुरवण्यासाठी सदैव सज्ज असतात. ही संपूर्ण टीम अचूक निदान, वैयक्तिकृत उपचार योजना आणि सहानुभूतीपूर्ण सेवेद्वारे मूव्हमेंट डिसऑर्डरग्रस्त रुग्णांचे जीवन सुधारण्यासाठी कटिबद्ध आहे. या उपक्रमामुळे मॅक्स हॉस्पिटल, नागपूर हे संपूर्ण परिसरात न्यूरोलॉजिकल इनोव्हेशनच्या आघाडीवर पोहोचले असून परिसरातील रुग्णांना सहज उपलब्ध असणारी उच्च दर्जाची आरोग्य सुविधा दिली जात आहे. हे क्लिनिक दर गुरुवारी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर येथे कार्यरत असेल.