Sun Nov 24 23:45:01 IST 2024
नागपूर : राज्यातील 10 वी उत्तीर्ण विद्यार्थांना औरंगाबाद येथील सर्विस प्रिपरेटरी इंस्टिट्यूट येथे प्रवेश मिळावा यासाठी 6 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता शंकरनगर चौक येथील श्री साई सभागृह येथे निःशुल्क मार्गदर्शन सत्राचे अायोजन करण्यात आल्याची माहिती लेफ्ट. कर्नल एम.पी. देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लेफ्ट. कर्नल देशपांडे म्हणाले, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, साहित्य प्रसार केंद्र व दी फोर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अायोजित मार्गदर्शन सत्रात संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. नॅशनल डिफेन्स अॅकडमी (एनडीए) येथे प्रवेशासाठी राज्यातील मुलांची टक्केवारी वाढावी यासाठी औरंगाबाद येथे राज्यशासनाने सर्विस प्रिपरेटरी इंस्टिट्यूटची स्थापणा केली आहे.
इंस्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना एनडीएत प्रवेश मिळावा यासाठी त्यांचाकडून तयारी करून घेतली जाते. या इंस्टिट्यूटमधील अनेक विद्यार्थांना एनडीएत प्रवेश मिळाला आहे. आज ते संरक्षण विभागात महत्वपूर्ण पदावर कार्यरत असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.