Fri Nov 22 04:23:17 IST 2024
नागपूर : महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बुधवारपासून ( ता. 11 जानेवारी ) श्रद्धानंदपेठ येथील शासकीय आयटीआय वस्तीगृहाच्या इमारतीत निःशुल्क बेसिक फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात अाले आहे.
ग्रामीण युवकांसाठी 21 दिवसांचे हे प्रशिक्षण आहे. 10 वी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी अर्ज करु शकतात. सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 वाजतापर्यंत प्रशिक्षण वर्गाचा वेळ राहील. तज्ज्ञाकडून फोटोग्राफी व व्हिडीओग्राफीचा इतिहास, मॉडलिंग, इंडस्ट्रीयल, वाईल्डलाईफ, वेडींग फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी शिकविल्या जाईल.
यासोबतच व्यक्तिमत्व विकास, प्रकल्प अहवाल, बाजाराचे सर्वेक्षण, मुद्राकर्जासह वित्तीय महामंडळाच्या विविध कर्ज योजनांची माहिती दिली जाईल. 18 ते 35 वयोगटातील विद्यार्थी या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेवू शकतात. अधिक माहितीसाठी संस्थेचे संचालक एन. के. सिंह यांच्याशी कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत 0712-2443482 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.