'टिचर इन यु' उपक्रमाद्वारे बारा हजार शिक्षकांना दिले प्रशिक्षण

शहर प्रतिनिधी 2017-08-19 22:29:32.0
img

नागपूर : ग्लोबल एज्यूकेशन लिमिटेड व जीएचआरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'टिचर इन यु' या उपक्रमाद्वारे राज्यातील बारा हजार शिक्षकांना मुल्यात्मक शिक्षणाचे प्रशिक्षण दिल्याची माहिती जीएच रायसोनीचे सीईओ राजिव चंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.               

ग्लोबल ऐज्युकेशन लिमिटेड व जीएचआरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात १३५ विविध ठिकाणी ' टिचर इन यु ' या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण उपक्रमात एकूण बारा हजार शिक्षकांनी भाग घेतला होता. त्यात त्यांना कुशल प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमात उच्च माध्यमिक शाळेची संख्या अधिक होती. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, व प्राचार्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

आता हा उपक्रम मध्यप्रदेश व छ्त्तीसगढ येथे देखील राबविण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण भारतात हे प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे राजीव चांद यांनी सांगितले. शिक्षक प्रशिक्षण उपक्रमाचे संचालक याशिन शेख व जीएच रायसोनीचे जनसंपर्क अधिकारी अमित गंधारे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Related Post