Fri Nov 22 04:08:17 IST 2024
नागपूर : पाचपावली पोलीसांनी मंगळवार (९ नोव्हेंबर) ला रात्री १० वाजताच्या सुमारास इंदोरा कामठी मार्गावरील गुरुपाल किचन येथे अवैध दारु प्रकरणी छापा टाकला. काही तळीरामांसह संशियतांना ताब्यात घेतले. अंदाजे ७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पोलीसांची हि कारवाई संशयास्पद असून या हॉटेलचे मुख्य 'पार्टनर'हे मोकाटच आहेत.
पाचपावली पोलीसांना गुरुपाल किचन येथे अवैध'ओपन बार'सुरु असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. त्या आधारावर पोलीसांनी मंगळवार (९ नोव्हेंबर) ला रात्री १० वाजताच्या सुमारास छापा टाकला. या छाप्या दरम्यान पोलीसांनी अवैध'ओपन बार'चालविणाऱ्या मुख्य संशयितांना सोडून इतर तळीरामांना अटक केली. मुख्य संशयित हे उपरोक्त किचन चे पार्टनर आहेत. आणि ते स्थानिक आमदार व वर्तमान मंत्री यांचे जवळचे आहेत. यामुळेच पाचपावली पोलीसांनी त्या पार्टनवर कारवाई केली नसल्याची चर्चा विरोधकांमध्ये आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कारवाईची गंभीर दखल घेऊन गुरुपाल किचनच्या नावावर अवैध'अोपन बार'चालविणाऱ्यां पार्टनवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. पोलीस मद्य प्रकरणी हाथ ठेले चालकांवर कारवाई करतात.
मग गुरुपाल किचन च्या आड मध्ये अवैध'ओपन बार'सुरु असताना या किचनला सिल का लावण्यात आला नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. शहराचा'क्राईम ग्राफ'चढता असताना उपरोक्त किचन मध्येअवैध'ओपन बार'सर्रास सुरु आहे. जर या किचन मध्ये एखादा अनुश्चित प्रकार घडला तर, त्याला जबाबदार कोण राहणार, असा सवाल आता या घटनेवरुन उपस्थित होत आहे. गुरुपाल किचन बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.