Fri Apr 04 06:48:59 IST 2025
नागपूर : पाच वाहनांना धडक दिलेल्याऑडीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुत्र संकेत बावनकुळे असल्याची माहिती बर्डी पोलिसांनी दिलेली आहे. ऑडी कार ही संकेत बावनकुळे यांच्या मालकीची आहे.
सोमवारी ०९ सप्टेंबर रोजी नागपूरमध्ये एक अपघात घडला ज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ओडी वाहनाने पाच वाहनांना धडक दिली. सुदैवाने, या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. सीताबर्डी पोलिसांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांनीच अगोदर ऑडी कारची नंबर प्लेट काढली. पण, विरोधकांकडून प्रकरण उचलल्यानंतर पोलिसांनी ती नंबर प्लेट कारच्या आतमध्ये ठेवली. आणि दुसऱ्यादिवशी गुन्ह्याची नोंद केली. आरटीओची भूमिकाही संशयास्पद आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत की अपघाताच्या वेळी संकेत बावनकुळे स्वतः या गाडीत उपस्थित होते. या आरोपांवर अद्याप अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अपघातानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून, सर्व घटनाक्रमाची चौकशी करण्यात येत आहे. सुषमा अंधारे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सखोल तपासाची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या आरोपात असे म्हटले की, संकेत बावनकुळे यांनी या अपघातासंदर्भात सत्य समोर यावे यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत.