Fri Nov 22 04:49:37 IST 2024
इंटरनेटच्या मायाजाळात वेगाने वाढ होत असल्याने डिजिटल मार्केटिंग हा एक करिअरचा चांगला पर्याय निर्माण झाला आहे. सर्च इंजिन ऑप्टिमिशन म्हणजे एसईओ किंवा वेब अॅनालिटिक्स (विश्लेषक) म्हणून करिअर करता येते.
ऑनलाईन यूजर आपल्या संकेतस्थळावर अधिकाधिक काळ कसा राहील आणि आपल्या संकेतस्थळाकडून यूजरला काय अपेक्षित आहे, यात संशोधन करण्याचे काम एसईओकडे असते. अद्यायावत आणि यूजरफ्रेंडली संकेतस्थळामुळे ग्राहकांची संख्या लाखांच्या घराने वाढू शकते. त्यामुळे संकेतस्थळ सुरू करणार्या कंपन्या तज्ज्ञ विश्लेषकाची नियुक्ती करतो जेणेकरून वेबमध्ये वेळोवेळी सुधारणा करता येऊ शकेल. दुसर्या बाजूने विश्लेषक हा कंपनीच्या संकेतस्थळामार्फत माहिती गोळा करत असतो. ही माहिती एकत्र करून तो कंपनीचे संकेतस्थळ अधिक आकर्षक कसे करता येईल, यासाठी तो विश्लेषण करत असतो. स्पर्धक संकेतस्थळाच्या तुलनेत आपल्या संकेतस्थळात असणार्या उणिवा दूर करून तो अधिकाधिक माहितगार संकेतस्थळाची निर्मिती करतो.
वेब डेव्हलपेंटसाठी एसईओची नितांत गरज असते. बहुतांशी कंपन्यांत एसइओंची नियुक्ती केलेली असते आणि ते अहोरात्र संकेतस्थळाच्या विकासासाठी योजना तयार करत असतात. तसेच संकेतस्थळाच्या निर्मितीसाठी नेमलेल्या तंत्रज्ञांशी संवाद साधून येणार्या अडचणी दूर करण्याचेही काम एसईओकडे असते. अनेक संकेतस्थळ हे यूजरशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेत असतात. यूजरच्या तक्रारी, सूचनांवर काम करण्याची जबाबदारी एसइओकडे असते. उदा. एखादी ईकॉमर्सच्या संकेतस्थळावर एखाद्या प्रॉडक्टबाबत किंवा डिलिव्हरीबाबत शंका असेल तर ग्राहक संकेतस्थळामार्फत कंपनीशी बोलतात. यावर ग्राहक सेवा अधिकारी हा कंपनीकडून दिलेल्या माहितीच्या आधारे संकेतस्थळामार्फत ग्राहकाच्या शंकेचे निरसन करतो. ही माहिती देण्याचे काम एसइओला करावे लागते. अर्थात त्याच्या मदतीला तंत्रज्ञ असतात. वेब अॅनालिटिक्स : संकेतस्थळामार्फत यूजरच्या येणार्या प्रतिक्रिया, वेबवर आणखी कोणत्या गोष्टीची गरज आहे, भविष्यात संकेतस्थळात कोणते बदल हवेत यासंदर्भात वेब अनालिटिक्स काम करत असतो. बाजारात असणार्या अन्य संकेतस्थळाने केलेल्या बदलाची माहिती घेऊन त्यापेक्षा अधिक सरस किंवा यूजरफे्रंडली संकेतस्थळ विकसित करण्यासाठी तो काम करत असतो. वेब अनालिटिक्स किंवा एसईओ पदासाठी किमान विज्ञान शाखेतील पदवीधर असावा, अशी अपेक्षा कंपनीची असते. एचटीएमएल आणि जावास्क्रिप्ट येणार्या विद्यार्थ्याला प्राधान्य दिले जाते. शक्यतो आयटी क्षेत्रातील नैपुण्यप्राप्त युवक असावा, असे कंपनीला वाटते.