Fri Nov 22 03:16:43 IST 2024
नागपूर : नागपुरातील एचसीएल टेक्नॉलॉजीजची विस्तारांतर्गत रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देताना पुढील दोन वर्षात कार्यरत लोकांची संख्या ५ हजारांवर नेण्याची योजना असल्याची माहिती एचसीएल टेक्नॉलॉजीज ली. चे मुख्य मानव संसाधन अधिकारी अप्पाराव व्ही. व्ही. यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
एचसीएल कॅम्पस मिहानमध्ये १४० एकरात असून एप्रिल २०१८ मध्ये कार्य सुरु केले होते. केवळ चार वर्षात ३५०० पेक्षा जास्त लोक कार्यरत आहेत . नागपूर कॅम्पस अत्याधुनिक सुविधायुक्त असून इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल आणि युनायटेड स्टेटस ग्रीन बिल्डिंग कौन्सिल या दोन्ही संस्थांद्वारे सर्वोच्च रेटिंग सह प्लॅटिनम प्रमाणित आहे. कंपनी सध्या डिजिटल फाउंडेशन , डिजिटल एंटरप्राइज , अप्लिकेशन सर्व्हिसेस व मॅनेजमेंट , इंजिनियरिंग आणि रिसर्च लाइन ऑफ बिझनेस मध्ये कार्यरत असून ७० पेक्षा जास्त जागतिक ग्राहकांना सेवा देते.
एचसीएल नागपूर त्यांच्या 'कम बॅक होम आणि स्टे रूटेड' मोहिमेद्वारे स्थानिक प्रतिभांना संधी उपलब्ध करून देऊन विकसित झाले आहे. कॅम्पस मध्ये ८०टक्के प्रतिभावंत नागपुरातील आहेत. ३० टक्के महिला कर्मचारी आहेत . कंपनी फ्रेशर्स ची नियुक्ती आणि प्रशिक्षण देऊन प्रतिभा आणि क्षमतांना प्रोत्साहन देत आहे . कंपनी मधील ४५ टक्के कर्मचारी नवीन आहेत. बारावी पास झाल्यानंतर ५०० पेक्षा जास्त जणांनी 'एचसीएल टेकबीज' आत्मसात केले आहे. एंट्री लेव्हल जॉब मध्ये कंपनी मध्ये कौशल्यावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आहेत.