'पिंक ई-रीक्षा' योजनेचा शुभारंभ, राज्यातील 10 हजार महिलांना मिळणार लाभ

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2025-04-20 17:42:08.0
img

नागपूर : महिला सशक्तीकरण व शाश्वत वाहतुकीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाने 'पिंक ई-रीक्षा' योजनेचा शुभारंभ केला आहे. महिला व बाल विकास विभागाच्या पुढाकाराने हाती घेतलेली ही योजना पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर या 8 जिल्ह्यांमध्ये 10 हजार पर्यावरणपूरक कायनेटिक ग्रीन इलेक्ट्रिक 3 -चाकी रिक्षांचे वाटप करून महिला सक्षमीकरण करणार आहे

आणि पर्यावरण रक्षणाला चालना देणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, महिला व बाल विकास मंत्री मा. श्रीमती अदिती तटकरे, राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर तसेच कायनेटिक ग्रीनच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुलज्जा फिरोदिया मोटवानी आणि सह-संस्थापक व कार्यकारी संचालक श्री. रितेश मंत्री यांनी 20 एप्रिल रोजी नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात महिलांना पहिला पिंक ई-रिक्षांचा ताफा सुपूर्द केला. या योजनेअंतर्गत प्रत्येक ई-रिक्षाच्या किंमतीवर महाराष्ट्र शासनाकडून 20% अनुदान दिले जाणार आहे, तर लाभार्थींना 10 टक्के रक्कम डाउन पेमेंट म्हणून भरावी लागणार आहे. उर्वरित 70 टक्के रक्कम बँक कर्जाद्वारे भागविण्यात येणार असून आर्थिक भागीदारांच्या मदतीने कमी व्याजदराने कर्ज मिळवून देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि बचत गटांबरोबर सहकार्य करण्यासाठी भौगोलिक पातळीवर जनजागृती कार्यक्रम देखील घेतले जातील. या योजनेअंतर्गत, कायनेटिक ग्रीनकडून मोफत वाहन प्रशिक्षण, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी मदत व मोठ्या प्रमाणात चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जाणार आहे. कायनेटिक ग्रीन आठही जिल्ह्यांमध्ये एकूण 1500 चार्जर पॉईंट उभारणार असून, लाभार्थ्यांसाठी संपूर्ण व एकात्मिक उपाययोजना उपलब्ध करून दिली जाणार आहे. वाहन व बॅटरीसाठी 5 वर्षांची वॉरंटी तसेच प्रत्येक तीन महिन्यात 1 मोफत सर्व्हिस ते ही 5 वर्षांपर्यंत, यासह वार्षिक मेन्टेनन्स कॉन्ट्रॅक्ट (एमएमसी) देण्यात येणार आहे. कायनेटिक ग्रीनकडून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड व विविध राईड-हेलिंग प्लॅटफॉर्म्सबरोबर भागीदारी केली जात आहे, ज्यामुळे प्रवाशांना फर्स्ट व लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळू शकेल. ही संपूर्ण योजना महिलांना शाश्वत आणि खात्रीशीर उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देणारी, विश्वासार्ह व पर्यावरणपूरक वाहतूक सुविधा पुरवणारी ठरणार आहे. या योजनेबाबत बोलताना, कायनेटिक ग्रीनच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, ?कायनेटिक ग्रीनमध्ये आम्ही शाश्वत वाहतुकीद्वारे अर्थपूर्ण बदल घडवण्यास वचनबद्ध आहोत. पिंक ई-रिक्षा योजना हे आमच्या दृष्टीकोनाचे प्रतीक आहे, कारण यात महिला सबलीकरणासह पर्यावरण संवर्धनाचा समावेश आहे. महिलांना सन्मानजनक व शाश्वत उपजीविकेचा पर्याय देत नाही आम्ही त्यांचे आर्थिक भवितव्य बदलवण्याबरोबरच आत्मविश्वास व स्वातंत्र्य देण्याचे काम सुद्धा या योजनेद्वारे करत आहे. हा उपक्रम सशक्त समाजनिर्मिती आणि स्वच्छ तसेच पर्यावरणपूरक भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे, जिथे प्रत्येक महिलेला भरभराटीची आणि शाश्वत जगासाठी योगदान देण्याची संधी मिळेल. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या भरभक्कम पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, कारण त्यांची प्रगतीशील धोरणे आणि आर्थिक मदत महिलांना सक्षम करण्यासाठी आणि राज्यभरात ग्रीन मोबिलिटीला स्वीकारण्यास गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे." कायनेटिक ग्रीनचे अध्यक्ष (मोबिलिटी व आंतरराष्ट्रीय व्यवसाय) श्री. सुधांशू अग्रवाल म्हणाले, "ही योजना केवळ महिलांना रोजगार पुरवण्यासाठी नाही, तर त्यांना स्वतःचे आयुष्य सक्षमपणे घडवण्याचा आत्मविश्वास देणारी आहे ज्यामुळे त्या समाजात अर्थपूर्ण योगदान देऊ शकतील. महिलांना स्वावलंबी बनवून आम्ही प्रतिष्ठेची व शक्तीची संस्कृती घडवत आहोत. पिंक ई-रिक्षा ही आशेचे व प्रगतीचे प्रतीक आहे जी सुरक्षित वाहतूक व्यवस्था पुरवताना पर्यावरणाच्या संवर्धनास चालना देणारी आहे. महाराष्ट्र सरकारसोबत मिळून, आम्हाला हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा अभिमान आहे, जेथे प्रत्येक महिलेला स्वतःचे भविष्य स्वतः घडविण्याची खात्री मिळेल." ही योजना 20 ते 50 वयोगटातील महिलांसाठी असून, विधवा, घटस्फोटित व दारिद्ररेषेखालील महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. कायनेटिक ग्रीन पिंक ई-रिक्षा एका चार्जमध्ये 120 किमीची रेंज देते. यामध्ये ड्युअल सस्पेन्शन, डिजिटल डिस्प्ले पॅनल, ड्युअल हेडलॅम्प्स व 220 मिमी ग्राऊंड क्लिअरन्स आहे. चालकासह चार प्रवाशांची आसनक्षमता असलेली ही रिक्षा 16-अँपियरच्या घरगुती सॉकेटने देखील चार्ज करता येते. कायनेटिक ग्रीनकडून लाभार्थी महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी एक एजन्सी नेमली जाणार आहे. सर्व महिला चालकांना त्यांच्या ई-रिक्षाचे कार्यक्षमतेने संचालन करता येईल यासाठी आवश्यक कौशल्ये दिली जातील. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने महिला सशक्तीकरण व ग्रीन मोबिलिटी क्षेत्रात उचललेले हे धाडसी पाऊल भविष्याच्या दृष्टीने अत्यंत आशादायक आहे आणि कायनेटिक ग्रीन अशा समतोल व शाश्वत समाजनिर्मितीच्या दिशेने कटिबद्ध आहे. कायनेटिक ग्रीन विषयी: कायनेटिक ग्रीन ही भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी असून, ती इलेक्ट्रिक तीनचाकी व दुचाकी वाहनांची विस्तृत श्रेणी सादर करते. ही वाहने पुण्याजवळील अत्याधुनिक प्रोडक्शन फॅसिलिटीमध्ये तयार केली जातात, ज्यामुळे भारत व ग्लोबल मार्केटसाठी ग्रीन मोबिलिटी सोल्यूशन्स विकसित करण्यास मदत होते. इलेक्ट्रिक गोल्फ कार्ट्स व बग्गी वाहनांसाठी, कायनेटिक ग्रीनने इटलीच्या जगप्रसिद्ध लक्झरी ब्रँड टोनीनो लॅम्बोर्गिनी सोबत जॉइंट व्हेंचर सुरू केला आहे.

फिरोदिया कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील वंशज सौ. सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांच्या नेतृत्वाखाली, कायनेटिक ग्रीन संपूर्ण भारतभर सुसज्ज इलेक्ट्रिक वाहन (एव्ही) प्रणाली निर्माण करण्यासाठी व कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या शाश्वत उपाययोजना विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे. कंपनीचे उद्दिष्ट केवळ उच्चभ्रू वर्गासाठी नव्हे तर सर्वसामान्यांसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी सुलभ करणे आहे. कायनेटिक समूहाच्या पाच दशकामधील अभियांत्रिकी उत्कृष्टतेच्या आधारावर, कायनेटिक ग्रीनने उच्च दर्जाची, सुरक्षित आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सजलेली उत्पादने सादर करून इलेक्ट्रिक मोबिलिटीला लोकांसाठी सुलभ व परवडणारी बनवली आहे. कंपनीच्या उल्लेखनीय कामगिरीत अनेक पहिल्यांदाच घडलेली उदाहरणे आहेत. भारतात एआरएआय मान्यता प्राप्त इलेक्ट्रिक तीनचाकी वाहन विकसित करणारी पहिली कंपनी आणि लिथियम आयन बॅटरी तंत्रज्ञान आपल्या तीनचाकी वाहनांमध्ये सादर करणारीही हीच पहिली कंपनी होती. अलीकडेच कायनेटिक ग्रीनने 'ई'लुना' हे वाहन सादर केले जी कायनेटिक समूहाच्या लोकप्रिय ?लुना? ब्रँडची इलेक्ट्रिक सुधारित आवृत्ती आहे जी वैयक्तिक वापरासाठी तसेच विकसनशील ई-कॉमर्स डिलिव्हरी क्षेत्रासाठी खूपच लोकप्रिय ठरले आहे. आपल्या जलद विस्ताराच्या योजना पूर्ण करण्यासाठी, कंपनीने अलीकडेच युकेस्थित ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल या खाजगी गुंतवणूक फंडाकडून सिरीज ए फेरीत 25 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक मिळवली असून, आणखी 30 मिलियन डॉलर्सचा निधी उभारण्याच्या प्रक्रियेत आहे.

Related Post