'अॅडव्हान्टेज विदर्भ-2025', खासदार औद्योगिक महोत्सव'चे 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान आयोजन

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2025-01-24 12:02:50.0
img

नागपूर : बहुप्रतिक्षित 'अॅडव्हान्टेज विदर्भ- २०२५: खासदार औद्योगिक महोत्सव'च्या दुसऱ्या आवृत्तीचे 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान नागपूरमधील अमरावती रोड येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कॅम्पस ग्राउंड येथे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) द्वारे आयोजित, या उपक्रमात,

विदर्भातील सर्वात मोठे इंडस्ट्रीयल एक्स्पो, बिजनेस कॉन्क्लेव आणि इन्व्हेस्टमेंट समीट होणार आहे. मागील वर्षी मिळालेल्या भरघोस यशानंतर वर्षीच्या अॅडव्हांटेज विदर्भचे मुख्य उद्दिष्ट विदर्भाला उद्योगासाठी जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी घोरणात्मक फायदे, दळण-वळण सुविधा आणि अफाट वाढीची क्षमता प्रदर्शित करणे हे आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते, गुंतवणूकदार, उद्योगपती, उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञांसह विविध क्षेत्रातील उदयोन्मुख व्यावसायिकांना आकर्षित केले जाईल. विदर्भाची औद्योगिक वाढ आणि विविध क्षेत्रीय बलस्थाने अधोरेखित करून त्याला एक प्रमुख गुंतवणूक स्थळ म्हणून प्रोत्साहन देणे, बाजारातील ट्रेंड, वाढीची धोरणे आणि उदयोन्मुख संधींवर चर्चा करून उद्योग क्षेत्रातील आघाडीचे नेतृत्व आणि नवोन्मेषकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करणे, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्याला प्रोत्साहन देणे, कौशल्य विकास आणि ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ करणे हे देखील या अॅडव्हांटेज विदर्भचे उद्दीष्ट आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (मुख्य पाहुणे), केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (तीनही दिवस उपस्थित राहणार आहेत), मुंबईतील थाई कॉन्सुल-जनरल डोनावित पूलसावत, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, उद्योग मंत्री उदय सामंत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र सरकारचे आयटी मंत्री आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण) आणि खाणकाम राज्यमंत्री पंकज भोयर, भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे, लॉयड्स स्टील अँड मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. इतर उल्लेखनीय व्यक्ती त्यांच्या सहभागाची पुष्टी करतील अशी अपेक्षा आहे.

तसेच, युनिकॉर्नचे संस्थापक, ज्यात बोटचे सह-संस्थापक आणि सीएमओ अमन गुमा, नोव्रोकर डॉट कॉमचे संस्थापक अखिल गुणा, प्रिस्टिन केअरचे सह-संस्थापक वैभव कपूर, पॉलिसीबाजारचे अध्यक्ष आणि सीईलो सर्ववीर सिंग आणि अपनावे सीईओ निर्मित पारीख हे स्टार्ट अप सेक्टर सत्रांमध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहतील. औद्योगिक प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल्स या औद्योगिक प्रदर्शनात विविध उत्पादने आणि बहु-क्षेत्रीय उद्योगांचा समावेश असेल, ज्यामध्ये ३०० हून अधिक स्टॉल असतील, ज्यात १०० सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी राखीव असतील. इतर स्टॉलमध्ये संरक्षण सार्वजनिक उपक्रम, स्टील आणि खाण मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सेबी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, जीएसटी विभाग, पोस्ट विभाग, सरकारी ई-मार्केटप्लेस (जीईएम), शैक्षणिक संस्था यासारख्या सरकारी विभागांकडून विविध क्षेत्रातील उत्पादन श्रेणी, यंत्रसामग्री आणि सेवा प्रदर्शित केल्या जातील. १७० स्टॉल्स आधीच बुक करण्यात आले आहेत आणि व्यवसायांना लवकरात लवकर त्यांचे स्टॉल्स बुक करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. स्टार्टअपसह विविध क्षेत्रांचा समावेश अॅडव्हांटेज विदर्भमध्ये स्टील, संरक्षण, विमान वाहतूक, बांबू, दुग्धव्यवसाय, शिक्षण, आयटी आणि आयटीईएस, लॉजिस्टिक्स, स्टार्टअप्स, फार्मास्युटिकल्स, अक्षय ऊर्जा, पर्यटन, वस्त्रोद्योग, रत्ने आणि दागिने, स्टार्टअप इकोसिस्टम एंगेजमेंट यासह विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय सेमिनार आणि तांत्रिक चर्चा आयोजित केल्या जातील. स्टार्टअप क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारी समितीमध्ये सचिव डॉ. विजय शर्मा; उपाध्यक्ष गिरधारी मंत्री आणि प्रणव शर्मा, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी यांच्यासह कार्यकारी समिती सदस्य प्रशांत उगेमुगे, राजेश रोकडे, रवींद्र बोरटकर, महेंद्र क्षीरसागर, निखिल गडकरी, विनोद तांबी, महेश साधवानी आणि संजय गुप्ता बांचा समावेश आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत आहेत. व्यावसायिक आणि उद्योजकांना त्यांच्या स्टॉलची अधिकृत वेबसाइट www.advantagevidarbha.in वर नोंदणी करून कार्यक्रमात सहभागी होता येईल. अधिक माहिती व स्टॉल बुकिंगसाठी, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी विजय फडणवीस यांच्याशी 9326546448 वर संपर्क साधावा किंवा कार्यकारी सचिव पंकज भोकरे यांना secretary@aidnagpur.in वर ईमेल करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Post