Fri Jul 04 08:06:19 IST 2025
मुंबई : किरीट सोमय्यांच्या आरोपांमुळेच सासूचं निधन झाले असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
बातम्यांच्या आघातामुळे पेडणेकर कुटुंबातील एकाचा बळी गेला आहे. सोमय्यांच्या आरोपांमुळेच सासूचं निधन झाल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. माझ्यावरील SRA घोटाळ्याचे आरोप खोटे आहेत. या संदर्भाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.
सोमय्या ट्रॅप आखतात मात्र, मी त्यांना घाबरत नाही. मी उद्या पोलीस चौकशीला सामोरं जाणार असल्याचेही पेडणेकर यांनी स्पष्ट केले. किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर यांनी खोटी कागदपत्रे दाखवून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) घोटाळा केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वरळी येथील गोमाता जनता एसआरएमधील काही गाळे हडपल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मुंबईच्या दादर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पेडणेकर या देखील चौकशीसाठी गेल्या होत्या. आता या सगळ्या घोटाळ्याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फेत चौकशी व्हावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.