Sun Nov 24 13:07:52 IST 2024
दिल्ली : ट्विटरनंतर इन्स्टाग्रामनंही कर्मचाऱ्यांची कपात केली होती. कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांमध्ये आता फेसबुकची पेरेंट कंपनी असेलेल्या मेटाचीही समावेश होणार आहे. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मेटानं हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.
कंपनीच्या महसुलात घट झाल्यानंतर सोशल मीडिया कंपनीनं ही कारवाई केली आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आज एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं की मी मेटाच्या इतिहासातील काही सर्वात कठीण बदल शेअर करत आहे. मी माझ्या टीमचा आकार सुमारे 13 टक्क्यांनी कमी करण्याचा आणि आमच्या 11,000 हून अधिक प्रतिभावान कर्मचाऱ्यांना कंपनीमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग म्हणाले की, "आम्ही खर्चात कपात करून आणि Q1 च्या माध्यमातून अधिक कार्यक्षम कंपनी बनण्यासाठी आम्ही महत्त्वाची पावलं उचलत आहोत." त्यामुळं मोठ्या प्रमाणात बजेट कपातीची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे डिजिटल जाहिरातींच्या कमाईत तीव्र मंदीमुळे कंपनीला हे पाऊल उचलावे लागले आहे.