मुंबईच्या तरुणीचे ३५ तुकडे, दिल्लीत हत्या

jitendra.dhabarde@gmail.com 2022-11-14 22:47:38.0
img

मुंबई : विकृत प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. गेल्या सहा महिन्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, अखेर पोलिसांनी या विकृती प्रियकराला बेड्या ठोकल्या आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब असं या आरोपीचं नाव आहे. श्रद्धा असं मृत तरुणीचे नाव आहे. दोघांची भेट ही मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये झाली होती. दोघांमध्ये आधी मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. पण, घरच्यांचा विरोध होत असल्यामुळे दोघेही दिल्लीला पळून गेले. दिल्लीमध्ये छतरपुर दोघे एकत्र राहत होते. श्रद्धाचे कुटुंबीय सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची विचारपूस करत होते.

पण, अचानक श्रद्धाचा काही दिवसांपासून संपर्क होत नसल्यामुळे कुटुंबीयांना संशय बळावला. श्रद्धाचे वडील दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी तिचा शोध घेतला पण काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांना सुरुवातीला कोणतीची माहिती मिळाली नाही. पण पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. त्याच एका खबऱ्याकडून माहिती मिळाली आणि आफताबला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Related Post