Fri Apr 04 07:05:50 IST 2025
जावा : इंडोनेशियाचं जावा बेट भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं. भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 162 वर पोहोचली असून, शेकडो लोक जखमी झाले आहेत.
भूकंपामुळे जवळपास 13 हजार लोक बेघर झाले असून, 2200 घरांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, अशी माहिती स्थानिक प्रशासनानं दिलीय.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार, 5.6 रिश्टर स्केलचे हे भूकंपाचे धक्का होते. पश्चिम जावा प्रांतातील सियांजुर प्रदेशात हे धक्के बसले.