Sun Nov 24 11:39:18 IST 2024
कतार : फिफा विश्वचषकाच्या दुस-या दिवशी इंग्लडने इराणचा 6 विरुद्ध 2 गोल फरकाने पराभव करत दणदणीत विजयी सलामी दिली. खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ब गटातील या सामन्यात इंग्लिश संघाने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. पहिल्या आणि दुस-या हाफमध्ये प्रत्येकी तीन-तीन गोल करून इराणचा अक्षरश: धुव्वा उडवला.
अर्ध्या तासाचा खेळ संपला तरी दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. इंग्लंडच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी इराणवर आक्रमण केले. ते गोलपोस्टच्या अगदी जवळ येत पोहचत होते, पण त्यांचे प्रयत्नांना यश आले नाही. दुसरीकडे इराणीयन खेळाडूंना फुटबॉलवर ताबा मिळवणे कठीण जात असल्याचे दिसले.
काही चाहते तिकिटावरून खलिफा स्टेडियमबाहेर गोंधळ घालत होत आहेत. चाहते स्टेडियमवर प्रवेश मिळवण्यासाठी FIFA अॅपवरून त्यांची तिकिटे दाखवताना त्यांना तांत्रिक अडचण येत होती. फिफाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात FIFA ने सांगितले की, काही प्रेक्षकांना FIFA तिकीट अॅपद्वारे तिकिटे मिळवण्यात समस्या येत आहेत. आम्ही या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. दरम्यान, ज्या चाहत्यांना त्यांचे मोबाईल तिकीट अॅक्सेस करता येत नाही त्यांनी त्यांचा ईमेल तपासावा. समस्या नसल्यास तेथे देखील निराकरण केले, ते काउंटरवर मदत घेऊ शकतात.