Fri Apr 04 06:46:01 IST 2025
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. शरद पवार यांना डॉक्टरांनी काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिलाय.
शनिवारी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठान आणि अॅग्री कल्चर अशा दोन बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दुपारी २ च्या दरम्यान शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील तेथे उपस्थित होत्या. त्यांनी तात्काळ डॉक्टरांची एक टीम बोलावली.
नुकतेच शरद पवार दिल्लीत राहून आलेत. तेथील प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. अशा वातावरणामुळे त्यांना त्रास जाणवलाय. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्यााचा सल्ला दिलाय.