Fri Feb 21 14:58:03 IST 2025
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमी फायनलचा सामना नेमका कुठे आणि कधी होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
न्यूझीलंडच्या संघाने धडाकेबाज कामगिरी करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ २०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये आमने सामने आले होते. त्यावेळी न्यूझीलंडने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे भारताचा आव्हान संपुष्टात आले होते. पण या पराभवाचा बदला आता भारतीय संघ घेऊ शकतो, हे आता समोर आले आहे. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहीलेला आहे. पण या सामन्यात जर भारताला धक्का बसला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते आणि त्यांना थेट स्पर्धेबाहेर जाऊ लागू शकते. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. भारताने या वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत न्यूझीलंडवर विजय मिळवला होता. पण आतापर्यंतच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड हा एकच संघ असा होता की, त्यांनी भारताला कडवी झुंज दिली होती. पण त्यावेळी न्यूझीलंडच्या संघात केन विल्यम्सन नव्हता. कारण त्यावेळी त्याला दुखापत झाली होती. पण या सामन्यात मात्र को नक्कीच असणार आहे आणि त्यामुळे भारतासाठी मोठा धोका असेल.
पण हा सेमी फायनलचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. या मैदानातच २०११ साली झालेल्या वर्ल्ड कपची अंतिम फेरी झाली होती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड कपचा हा सेमी फायनलचा सामना १५ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता या सामन्यात भारत विजयासह बदला घेणार का किंवा न्यूझीलंडचाच संघ सेमी फायनलमध्ये सरस ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे सेमी फायनलच्या सामन्यात आता कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.