Mon Apr 07 14:45:20 IST 2025
नवीदिल्ली : अमेरिकेने सीरियातील इराण समर्थक गटांवर हवाई हल्ला केला आहे. इराणवर हमासला मदत केल्याचा आरोप आहे.
इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला करत हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर अद्यापही युद्ध सुरुच आहे. युद्धाची झळ सामान्य नागरिकांना बसत असून गाझा पट्टीवरील शेकडो सामान्य नागरिकांना नाहकपणे आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे जगभरातून इस्रायलवर टीका होत असताना पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासचा पराभव करण्यासाठी आपण कटिबद्द असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसंच गरज पडली तर आपण जगाविरोधात उभे राहू असं वृत्त टाइम्स ऑफ इस्रायलने दिलं आहे.
पंतप्रधान नेतान्याहू यांनी संरक्षणमंत्र्यांसह घेतलेल्या संयुक्त परिषदेत पाश्चिमात्य देशाच्या नेत्यांना तुम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन केलं आहे. हा विजय संपूर्ण जगाचा विजय असेल असं ते म्हणाले आहेत. टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, युद्धाच्या पार्श्वभूमीवर जर पॅलेस्टाइन प्रशासन पुन्हा गाझा पट्टीत परतलं तर आम्ही विरोध करु.