Fri Nov 22 03:53:23 IST 2024
नागपूर : मुंबई पोलिसांनी डाबर ग्रुपचे संस्थापक मोहित बर्मन आणि संचालक गौरव बर्मनच्या यांच्याविरोधात महादेव बेटिंग अॅप प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. यात बॉलिवूड अभिनेता साहिल खानसह ३१ जणांची नावे आहेत.
महादेव बेटिंग अॅप घोटाळ्याने छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत मोठी खळबळ उडवून दिली. या घोटाळ्यात राजकारणी,आणि बॉलिवूड सेलिब्रिटी अडकल्यानंतर आता उद्योगपती पोलिसांच्या रडारवर आली आहेत. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर डाबर समूहाने निवदेन जाहीर करत आपली प्रतिक्रिया दिलीय. डाबर ग्रुप आणि बर्मन कुटुंबाचं सट्टेबाज अॅपच्या घोटाळ्यात कोणताही संबंध नसल्याचं म्हटलंय. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर आणि प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांबाबत त्यांना कोणतीही औपचारिक माहिती मिळालेली नसल्याचं बर्नम कुटुंबाच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे.
?आम्हाला अशा कोणत्याही एफआयआरची माहिती मिळालेली नाही. आम्हाला एफआयआर माध्यामांद्वारे एफआयआ दाखल झाल्याचं समजत आहे. परंतु एफआयआर दाखल झाल्याची माहिती खोटी आणि निराधार आहे. एफआयआरमध्ये सर्व काही चुकीचे नमूद करण्यात आले आहे. त्याचा सत्याशी काहीही संबंध नाही.? असं प्रवक्त्याकडून सांगण्यात आलं आहे. माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या एफआयआरच्या प्रतीनुसार, मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांच्यावर काही आरोपींशी थेट संबंध असल्याचा आरोप केला जातोय. ?अनसिन एक्झिबिट-एफ?मध्ये तथाकथित नातेसंबंधांचा पर्दाफाश होणार असल्याचे बोलले जातंय. तर मुंबई पोलिसांनी एफआयआरमध्ये नाव दिलेल्या एकाही आरोपीला बर्मन कुटुंबीय कधीही भेटले नाहीत, असेही प्रवक्त्याकडून सांगण्यात आलंय. दरम्यान, पहिली तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी माटुंगा पोलिसात दाखल केली होती. या बेटिंग अॅपद्वारे हजारो लोकांची १५ हजार कोटी रुपयांची अधिक फसवणूक झालीय. माटुंगा पोलिसांनी भारतीय दंड संहिता, जुगार कायदा, आयटी कायद्याच्या विविध कलमांचा समावेश करून एफआयआर नोंदविला आहे आणि अनेक नावे बाहेर येत असतानाही पुढील तपास सुरू केलाय. महादेव बेटिंग अॅपच्या घोटाळ्यात राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योगपतींची नावे समोर येत असल्यानं अंमलबजावणी संचालनालय (ED) द्वारे चौकशी केली जात आहे.