Fri Jul 04 06:59:31 IST 2025
मुंबई : टीम इंडिया आणि न्यूझीलंड सेमीफायनलच्या पार्श्वभूमीवर ( Semi Finals clash between India and New Zealand) लिटील मास्टर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कडक इशारा दिला आहे. तसेच फूटवर्क आणि धोरणात्मक दृष्टिकोनामुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला भारतीय फिरकी गोलंदाजांना, विशेषत: कुलदीप यादवला उपांत्य फेरीत सामोरे जाण्यात अडचणी येणार नाहीत, असे मत व्यक्त केलं आहे.
सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, तो (केन विल्यमसन) अनुभवी खेळाडू आहे आणि दीर्घ विश्रांतीनंतर तो पुनरागमन करत असला तरी काही फरक पडत नाही. त्याने धावा केल्या आहेत. तो पुढे म्हणाले की, तो त्याच्या स्टेप्सचा चांगला वापर करतो. टर्नचा सामना करण्यासाठी तो त्याच्या क्रीजचा चांगला वापर करतो. तो खूप चांगला खेळाडू आहे आणि त्यामुळे कुलदीपला खेळण्यात त्याला काही अडचण येईल असे मला वाटत नाही. कुलदीपचा सामना करताना अडचण येईल, असे वाटत नाही.
गावसकर म्हणाले की, विल्यमसनची फलंदाजी केवळ त्याचे तांत्रिक ज्ञान आणि स्ट्रोकप्लेपुरती मर्यादित नाही आणि गरज पडेल तेव्हा तो लांब शॉट्स खेळण्यातही पटाईत आहे. ते म्हणाले की, "गरज पडल्यास तो स्ट्राईक रोटेट करण्यावर भर देईल, पण जर एखादा लूज बॉल असेल तर तो त्यावर चौकारही मारेल. 2019 मध्ये केन विल्यमसनचा हा फॉर्म आम्हाला दिसला नाही, पण इथेही आम्ही त्याला फटके मारताना पाहिले आहे. तो कुलदीप यादवविरुद्धही अशी वृत्ती स्वीकारू शकतो.