Fri Apr 04 06:59:08 IST 2025
नागपूर : शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना आज सकाळी भोपाळ येथे ताब्यात घेण्यात आले. त्यांनी मालेगाव येथील रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र ते न फेडल्याने हा आकडा ३० कोटीच्या घरात पोहोचला आहे. या प्रकरणात त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे रमजान पुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय हिरे कुटुंबातील सदस्यांनी शासनाची फसवणूक करून शिक्षक भरती केल्याचा देखील आरोप आहे.
शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील यांनी कोणतीही खातरजमा न करता प्रस्ताव मंजूर केल्याने किरण कुवर यांनी यापूर्वी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सर्वांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे, तथापि रेणुका सूतगिरणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे हिरे यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र त्यांचा जामीन नुकताच फेटाळण्यात आला, त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होतं. मालेगाव पोलीस त्यांचा शोध घेत असताना ते भोपाळ येथे असल्याचे समजले, तेथे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.