काश्मीर खो-यात चीनचे झेंडे फडकले

विशेष प्रतिनिधी 2016-10-15 12:55:54.0
img

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये आंदोलनादरम्यान चीनचे झेंडे फडकविण्यात आले. शुक्रवारी (14 ऑक्टोबर) नमाज झाल्यानंतर बारामुल्ला परिसरात आंदोलनकर्त्यांनी चीनचे झेंडे फडकवल्याची विश्वस्त माहिती मिळाली आहे.

काश्मीर खो-यात पाकिस्तानचे झेंडे फडकवल्याचे अनेकदा दिसून आले. मात्र चीनचे झेंडे आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच फडकवल्याची बाब समोर आली आहे. हि बाब गंभीर असून भारतासाठी हा धोक्याचा इशारा असल्याचे मानले जात आहे.

विश्वस्त सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नमाज संपल्यानंतर काही जणांनी चीनचा झेंडा हातात घेत, 'आम्हाला चीनकडून मदत हवी आहे', अशी घोषणाबाजी करत निदर्शन करायला सुरुवात केली. यावेळी जवळपास पाच ते सहा चीनचे झेंडे आंदोलनकर्त्यांच्या हातात पाहायला मिळाले. हे झेंडे हातात घेणाऱ्यांचे चेहरे झाकलेले होते. दोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अश्रूधूराचा वापर करत आंदोलनकर्त्यांना पांगविले.

Related Post