रिपोर्टची गरज नाही...... पुणे आयुक्तांचं मोठं वक्तव्य

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-05-24 15:13:16.0
img

Pune : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठं विधान केलं आहे. जेव्हा अपघात घडला तेव्हा अल्पवयीन आरोपी हा पूर्ण शुद्धीत होता. तसेच, त्याला याचीही जाणीव होती की त्याच्या या कृत्याचे परिणाम काय असतील.

पुणे कल्याणीनगर पोर्शे अपघात कारवाईत पोलिसांनी चांगलाच वेग पकडला आहे. अल्पवयीन आरोपीला अता बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे. ५ जूनपर्यंत त्याची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तर त्याचे वडील बिल्डर विशाल अगरवाल यालाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता पोलिस या प्रकरणात आणखी पुरावे गोळा करत आहेत. त्याशिवाय अल्पवयीन आरोपीने ज्या बारमध्ये दारु प्यायली होती. त्याच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरुवातीच्या तपासात तर हे देखील मान्य करण्यात आलं नव्हतं की आरोपीने मद्यप्राशन केलं आहे. पण, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे की ब्लड रिपोर्ट त्यांच्यासाठी इतकी महत्त्वाची नाही. आयुक्तांनी सांगितलं की, अल्पवयीन आरोपी पूर्णपणे शुद्धीत होता. त्याला माहिती होतं की जर तो मद्यप्राशन करुन गाडी चालवेल तर कोणाचा जीवही जाऊ शकतो. तसेच, आयुक्तांनी हेही सांगितलं की या प्रकणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व पुरावे गोळा केले जात आहेत. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला १५ तासात जामीन मान्य करण्यात आला होता. घडलेल्या घटनेवर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटीवर त्याला जामीन मंजूर झाला होता. त्यावरुन मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. संपूर्ण देशात यावरुन संताप व्यक्त करण्यात आला होता. पण, पोलिसांनी त्याला बाल हक्क न्यायालयासमोर हजर करत त्याचा जामीन रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावरुन कोर्टाने त्यला ५ जूनपर्यंत बाल सुधार केंद्रात पाठवण्यात आलं आहे. आता पोलिस या प्रकरणात आणखी पुरावे आणि साक्ष गोळा करत आहे. पोलिसांनी बाल हक्क न्यायालयात मागणी केली आहे की अल्पवयीन आरोपीला अल्पवयीन म्हणून नाही तर प्रौढ म्हणून खटला चालवण्यात यावा. पण, यावर अद्याप निर्णय झालेला नसून त्यासाठी १ ते ३ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या सगळ्यादरम्यान आला अल्पवयीन आरोपी आणि वडील विशाल अगरवाल यांनी पोलिस चौकशीत असा दावा केला आहे की अपघातावेळी त्यांचा चालक गाडी चालवत होता अल्पवयीन नाही. त्यामुळे आता यावर पोलिस काय करणार हे महत्त्वाचं ठरते.

Related Post