Fri Nov 22 04:51:35 IST 2024
नागपूर : भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल हे नागपुरात कार्यरत असताना त्यांनी एका महिलेला चुंबनची मागणी केली होती. पण, संबंधित महिलेने भीतीपोटी त्यांची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाची वाच्यता कुठेही झालेली नाही आणि हे प्रकरण शांत झाले.
अशोक बागुल हे स्वतःला कर्तव्यदक्ष अधिकारी समजतात. पण, ते नाही. असते तर त्यांनी आता कार्यरत भंडारा येथे एका महिलेला लैंगिक सुखाची मागणी केली नसती. त्यांच्या या प्रवृत्तीवरून त्यांची कार्यपद्धती लक्षात येते. ते स्वतःला एक कलावंतही समजतात. अनेकदा त्यांना नागपुरात सांस्कृतिक कार्यक्रमात बघितल्या गेले आहेत. आणि त्यांनी कलेप्रति प्रेमही व्यक्त केलं आहे. बागुल हे बाईवेडे आहेत. बागुल हे नागपुरात कार्यरत असताना एकदा एक महिला काही कामानिमित्त त्यांना कार्यालयात भेटायला गेली होती.
त्यावेळी बागुल यांच महिलेशी संबंधित विषयावर चर्चा झाली. चहापान झाला. अश्यातच संधी साधून बागुल यांनी 'त्या महिलेला तुम्ही किती सुंदर दिसता', अश्याप्रकारची सौदर्य प्रशंसा केली. तुमचे ओठ कोमल दिसता असे म्हणत चुंबनाची मागणी केली. त्यावेळी महिलेने समयसूचकता दाखवीत विषय बदलविला. बागुल यांनी अश्याचप्रकारे अनेक महिलांचा विनयभंग केला असेलच. पण, पोलीस अधिकारी असल्याने अनेक महिलांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली नसेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडाऱ्यात घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. बागुल हे जिथे जिथे कार्यरत होते. तिथे तिथे त्यांच्या कार्याचं मूल्यमापन करण्यात यावं. त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात यावा. राज्य शासनाने या संबंधात विशेष महिला तक्रारण समिती गठीत करावी. ज्यामुळे बागुलांसारख्या काही पोलीस अधिकाऱ्यांच पितळ हे उघड पडेल. नागपुरात कार्यरत असताना बागुल यांनी ज्या महिलेला चुंबनाची मागणी केली होती. ती महिला एका युट्युब चॅनलची वार्तहर आहे, हे विशेष.