Fri Nov 22 03:51:57 IST 2024
मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेची घोषणा केली आहे. याच योजनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ( शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका केली.
शरद पवार म्हणाले की, "लाडकी बहीण आणि लाडका भाऊ हे यंदाच्या अर्थसंकल्पात आणले गेले. अजित पवार आणि जयंत पाटील यांना 6 ते 7 वेळा बजेट मांडण्याची संधी मिळाली. परंतु यात कधी भाऊ आणि बहीण आलेले दिसले नाही. बहीण भावांचा विचार होतोय याचा आम्हाला आनंद आहे. परंतु हा सगळा चमत्कार लोकसभा निवडणुकीत लोकांनी केलेल्या मतदानाचा चमत्कार आहे. मतदारांनी व्यवस्थीत मतदान केलं की भाऊ बहीण सर्वांचीच अडचण होते."
शरद पवार पुढे म्हणाले की, " महाराष्ट्र हे देशातील 2 ते 3 नंबरचं राज्य होतं. परंतु आता ते 11 व्या क्रमांकावर गेलं आहे. महाराष्ट्रावर अंदाजे 60 लाख 80 हजार कोटींचे कर्ज आहे. त्यात यंदाच्या वर्षीचं 1 लाख 10 हजार कोटींचं कर्ज वेगळं आहे." रक्षाबंधनला लाडक्या बहिणीला सरकारकडून ओवाळणी रक्षाबंधनच्या दिवशी लाभार्थी महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली असून दोन महिन्यांची रक्कम एकाच वेळी लाभार्थी महिलांना दिली जाणार आहे.