उमरेडच्या नांद धरणाचे 7 दरवाजे उघडले, नदीकाठच्या लोकांनी रहावं सावधान

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-07-20 09:32:04.0
img

नागपूर : आज 20 जुलै रोजी नांद (ता. उमरेड जि नागपूर) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असुन. यामुळे धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज सकाळी धरणात येणाऱ्या पाण्यानुसार व आवश्यकतेप्रमाणे धरणाचे 7 दरवाजे 35 से.मी. ने उघडुन धरणातील पाणी नदी पात्रात सोडण्यत येत आहे.

तरी नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी आपल्या स्वता:सह कुटूंबीयांची व इतर नागरीकांच्या जानमालाची व जनावरांची योग्य ती खबरदारी घ्यावी. कुठल्याही परिस्थितीत कुणीही नदी पात्र ओलांडू नये.


Related Post