Fri Nov 22 04:23:52 IST 2024
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग नागपूर शहर जिल्हाध्यक्ष अरविंद ढेंगरे यांच्या वतीने जनविश्वास सप्ताहात अंतर्गत अंध विद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस अंध विद्यार्थ्यांसोबत केक कापून साजरा करण्यात आला.
लहान मुलांना बर्गर, केक, केळी, चिप्स व पाणी बॉटल वाटप करण्यात आले याप्रसंगी नागपूर शहर अध्यक्ष प्रशांत पवार, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर, महिला आयोग सदस्य व मुख्य प्रवक्त्या आभाताई पांडे, नागपूर शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, सामाजिक न्याय विभाग शहर कार्याध्यक्ष महेश भरके,
महिला कार्याध्यक्ष ज्योतीताई तिडके, शहर उपाध्यक्ष पुरोहित कांबळे, चंद्रकांत भोयर, विजय शेंडे, प्रज्ञा शीला ताई घाटे, प्रभुदास तायवडे, लाला नागपुरे, ग्रामीण अध्यक्ष प्रकाश वाघमारे, कार्याध्यक्ष उत्तम जी दास, शहर सचिव विनोद भाऊ शेंडे, नामदेराव शंभरकर, दक्षिण नागपूर अध्यक्ष राजु भाऊ मुन, उत्तर नागपूर अध्यक्ष कमलेश मेश्राम, मध्य नागपूर अध्यक्ष राजेश यादव, दक्षिण कार्याध्यक्ष राजेंद्र मून, उपाध्यक्ष बंडुजी मडके, महासचिव कीशोर चिवंडे,अनुपमा सहारे, मिलिंद सहारे, प्रियांशु शेंडे, विकास करणुके आदी पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.