Fri Apr 04 07:07:25 IST 2025
मुंबई : वजन अधिक भरल्यामुळं विनेश 50 किलो वजनी गटात अपात्र ठरली असून, त्यामुळं तिचं ऑलिम्पिक गोल्डचं स्वप्न भंगलं आहे. 100 ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळं विनेशला माघार घ्यावी लागत आहे. अंतिम सामन्यापूर्वी वजन केलं असता वजन जास्त भरल्यामुळं विनेशला हा धक्का पचवावा लागणार आहे.
'ऑलिम्पिकमध्ये असणाऱ्या भारतीय गटाकडून अतिशय निराशाजनक बातमी जाहीर करण्यात येत असून, ही बातमी आहे विनेश फोगटच्या अपात्रतेची', असं IOA च्या अधिकृत पत्रकात म्हटलं गेलं आहे. संपूर्ण टीमकडून प्रचंड मेहनत केली असून येऊनही विनेश सामान्यापूर्वी वजन केलं असा 50 किलोहून काही ग्रॅम अधिक वजन भरल्यामुळं ही परिस्थिती ओढावली. सध्याच्या घडीला ऑलिम्पिकमध्ये सहभागी असणाऱ्या भारतीय गटाच्या वतीनं आणखी कोणतीही सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. स्वप्नभंग करणारं हे वृत्त जारी करण्यापूर्वी सूत्रांचा हवाला देत इंडियन एक्स्प्रेसनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पात्रतेसाठी आवश्यक असणाऱ्या वजनापलिकडेही विनेशचं वजन 100 ग्रॅमनं अधिक भरलं, ज्या कारणामुळं विनेश या अंतिम सामन्याआधीच अपात्र ठरली असं म्हटलं जात आहे. मंगळवारी पार पडलेल्या फेरीसाठी तिनं नियमाप्रमाणं वजन केलं होतं. पण, स्पर्धेच्या दोन्ही दिवसांसाठी कुस्तीपटूंनी निर्धारित वजनी गटाच्या मर्यादेत राहणं अपेक्षित असतं. पण, प्रचंड मेहनत घेऊनही तसं विनेशला अनपेक्षित अपयशाला सामोरं जावं लागलं.
विनेशनं ज्या सामन्यात विजय मिळत अंतिम सामन्यात धडक मारली होती, त्या दोन्ही सामन्यांमध्ये काही तासांचं अंतर होतं. मंगळवारी तिच्या विजयी हॅटट्रिकनंतर एका पदकाशी निश्चिती होतीच. पण, अंतिम सामन्याच्या 12 तासांपूर्वीच विनेशसंद्रभातील ही बातमी समोर आली आणि संपूर्ण देशानं निराशेचा सूर आळवला. बुधवारी रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी विनेशचा सुवर्णपदकासाठीचा सामना सारा हिल्डेब्रांटशी होणार होता. सारानं उपांत्य फेरीमध्ये चीनच्या फेंग जिकीचा 7-4 नं पराभव केल्यानंतर आता तिच्यासमोर विनेशचं आव्हान होतं.