भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-08-08 22:15:17.0
img

पॅरिस : भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पेनवर २-१ असा दमदार विजय साकारला. भारताचे हे सलग दुसरे कांस्यपदक ठरले.

टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते. भारताने हॉकीच्या कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनला कडवी झुंज दिली. स्पेनने सामन्याच्या १८ व्या मिनिटाला गोल केला होता. त्यामुळे त्यांनी १-० अशी आघाडी घेतली होती. पण भारतानेही हार मानली नाही. दुसरे सत्र संपायला फक्त ४८ सेकंदं शिल्लक असताना भारताने पेनेल्टी कॉर्नरवर गोल केला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. भारताने त्यानंतर पेनेल्टी कॉर्नरवर ३३ व्या मिनिटाला पुन्हा एकदा गोल केला आणि भारताने २-१ अशी आघाडी घेतली. ही आघाडी भारताने तिसऱ्या सत्रातही कायम ठेवली. चौथ्या सत्रातही भारताने दमदार कामगिरी केली. पहिल्या सत्रात भारत आणि स्पेन दोघांनाही गोल करता आला नाही. पण दुसऱ्या सत्रातील १८ व्या मिनिटाला भारतीय खेळाडूंच्या चुकीमुळे स्पेनला पेनेल्टी स्ट्रोक देण्यात आला. स्पेनने या सुवर्णसंधीचा चांगलाच फायदा उचलला आणि त्यांनी गोल केला. त्यामुळे स्पेनने सामन्याच्या १८ व्या मिनिटालाच १-० अशी आघाडी घेता आली. पण दुसऱ्या सत्राची फक्त ४८ सेकंदं शिल्लक असताना भारताला पेनेल्टी कॉर्नर मिळाला होता. या संधीचा पुरेपूर फायदा भारताने उचलला आणि गोल केला. त्यामुळे दुसऱ्या सत्रात भारताने १-१ अशी बरोबरी साधली होती.

भारत आणि स्पेन यांच्यातील हॉकी सामन्याचे पहिले सत्र चांगलेच रंगले. स्पेनचा संघ हा यावेळी जोरदार आक्रमण करत होता. पण त्याचवेळी भारताचा उत्तम बचाव यावेळी पाहायला मिळाला. त्यामुळेच स्पेनला यावेळी गोल करण्यात यश मिळत नव्हते. पण भारतीय संघ हा फक्त बचाव करत नव्हता, तर त्यांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा ते जोरदार आक्रमणही करत होते. पण त्यांना पहिल्या सत्रात स्पेनचा बचाव भेदता आला नव्हता. भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला होता. पण उपांत्य फेरीत त्यांना २-३ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळेच त्यांना कांस्यपदकासाठी स्पेनशी दोन हात करावे लागले होते. गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदक पटकावले होते. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय संघ पदक पटकावणार का, याची उत्सुकता यावेळी सर्वांना लागलेली होती. कांस्यपदकाच्या लढतीमध्ये यावेळी सर्वांच्या आशा होत्या त्या गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि हरमनप्रीत सिंग या दोघांवर. कारण श्रीजेशचा हा अखेरचा सामना होता. त्यामुळे त्याच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. दुसरीकडे हरमनप्रीत चांगल्या फॉर्मात होता. त्यामुळे तो गोल करतो की नाही, यावर सर्वांच्या नजरा खिळलेल्या होत्या.

Related Post