Fri Jul 04 08:27:12 IST 2025
HSC Result 2025 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. सोमवारी 5 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल असून 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी बोर्डाच्या संकेतस्थळावर रिझल्ट पाहू शकणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडाळामार्फत बारावीचा निकाल सोमवारी ऑनलाइन पद्धतीने जाहिर करण्यात येणार आहे. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. त्यानंतर विद्यार्थी या माहिती प्रिंटदेखील काढू शकतात. तसंच, डिजीलॉकर अॅपमध्ये डिजीटल रिझल्ट संग्रहीत करुन ठेवण्याची सोयदेखील उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
या लिंकवर निकाल पाहू शकणार आहात 1. https://results.digilocker.gov.in 2. https://mahahsscboard.in 3. http://hscresult.mkcl.org 4. https://results.targetpublications.org 5. https://results.navneet.com कसा पाहाल निकाल? - सगळ्यात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा. - होमपेजवर ?महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025? लिंक दिसेल. त्याला क्लिक करा. - क्लिक करताच नवीन विंडो ओपन होईल. त्याठिकाणी सीट नंबर आणि इतर माहिती भरुन ?सबमिट? बटनवर क्लिक करा. - त्यानंतर तुमचा बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.