Fri Jul 04 07:26:43 IST 2025
मुंबई : धावपटू कविता राऊतसह इतर आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. तशा प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी मान्यता दिली आहे.
या खेळाडूंमध्ये कविता राऊत(आदिवासी विकास विभाग), ओंकार ओतारी (तहसीलदार), संदीप यादव (क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा विभाग), अजिंक्य दुधारे(क्रीडा मार्गदर्शक), पूजा घाटकर (विक्रीकर निरीक्षक), नितीन मदने (तहसीलदार), किशोरी शिंदे ( नगरविकास विभाग) व नितू इंगोले( क्रीडा विभाग) यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे. यासाठी राज्य सरकारचे विशेष धोरण आहे. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार या आठ खेळाडूंची निवड केली.