Fri Nov 22 04:13:20 IST 2024
नागपूर : शंकरनगरातील क्लाऊड सेव्हन बार येथील कर्मचाऱ्यांशी आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिजीत खोपडे यांच्याशी रविवारी (ता. २० ) मध्यरात्री रोजी झालेल्या वादात शुभम महाकाळकर यांचा खून झाला.
अंबाझरी पोलिसांना या प्रकरणी बार मालक सनी बामब्रतवार याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला. या सोबतच बार मधील कर्मचा-यांच्या तक्रारीवरुन अभिजित व रोहित खोपडे यांच्याविरोधात तोडफोड व हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हाही नोंदविला. शहरातील क्लाऊड सेव्हन बार येथे अभितीज खोपडे हा तरुण मित्रांसोबत गेला होता. येथे किरकोळ कारणावरुन त्यांचा बारमधील कर्मचाºयांसोबत वाद झाला व त्यातून त्यांनी तोडफोड केली. काही वेळात रोहित खोपडे व शुभम महाकाळकर हेदेखील तेथे पोहोचले. त्यांनीदेखील तेथे दमदाटी केली व सर्व जण तेथून निघून गेले.
मात्र काही वेळातच बारचे कर्मचारी व त्यांच्या साथीदारांनी शुभम महाकाळकर व काही तरुणांना लक्ष्मीभुवन चौकाजवळ पकडले. त्यांनी तरुणांच्या गाड्यांची तोडफोड केली व शुभम महाकाळकर याला भोसकून ठार केले. बारचे कर्मचारी व आमदारपुत्राच्या वादात शुभमचा बळी गेला.