पंतप्रधान मोदींचा नोटाबंदीचा निर्णय धाडसी : चीन

2016-11-26 17:50:52.0
img

बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर देशातील विरोधी पक्षांकडून आगपाखड सुरू असली तरी चीनमधील प्रसारमाध्यमांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय अत्यंत धाडसी आहे, असे कौतुक चीनच्या प्रसारमाध्यमांनी केले आहे.

मोदींची ही लढाई भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातील महत्त्वाचे पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया चीनमधील माध्यमांतून आली आहे. चीनच्या सरकारी प्रसार माध्यमांनुसार नोटाबंदीचा निर्णय यशस्वी होईल की नाही हे माहिती नाही. मात्र हा निर्णय एक उदाहरण म्हणून समोर ठेवण्यात आला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये छापण्यात आलेल्या संपादकीयमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदी निर्णयाचे पाऊल धाडसी आहे. जर चीनमध्ये 50 किंवा 100 युआनच्या नोटा बंद केल्या तर चीनमध्ये काय होईल याबाबत आम्ही कल्पना करू शकत नाही. तसेच नोटाबंदी निर्णयाची अंमलबजावणी करताना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी याची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली. नोटाबंदीचा हा निर्णय काळा पैशांविरोधात आहे. दरम्यान, मोदी हा निर्णय लागू करण्याआधी गोंधळात होते, असेदेखील या वृत्तपत्रात नमूद करण्यात आले. संपादकीयमध्ये असेही मांडण्यात आले आहे की, 'भारतात जवळपास 90 टक्के व्यवहार हे रोखीद्वारे होतात. भारतात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचे प्रमाण 85 टक्के एवढे आहे.

भारत सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात ब-याच अडचणीदेखील निर्माण होत आहेत. अगदी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या निर्णयाचा संघटित लूट असा उल्लेख केला आहे. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार रोखला जाऊ शकतो. मात्र त्याचा प्रचार करणारे सामाजिक आणि राजकीय समस्यांचे समाधान होणे कठीण आहे, असा आशय देखील संपादकीयमध्ये छापण्यात आला आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्रातील संपादकीयनुसार, मोदींचा नोटाबंदीचा निर्णय एक जुगार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीपासून ते सामान्यांच्या संयमाची क्षमता पारखली जात आहे. या निर्णयाचा फायदा अन्य बाबींच्या परिणामांना कमी करण्यात यश येईल, अशी अपेक्षा आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे धाडसी पाऊल उचलण्यासाठी खूप कमी संधी असते. नोटांबदी निर्णय यशस्वी होवो अथवा अयशस्वी, मात्र हा निर्णय एक उदाहरण म्हणून नक्की समोर येईल. बदल नेहमी कठीण असतो. मोदींचा नोटाबंदीचा निर्णय योग्य विचारातून आला आहे. मात्र, याचे यश व्यवस्था आणि समाजाच्या सहकार्यावर अवलंबून आहे. चीनमध्ये देखील गेल्या 40 वर्षांपासून सुधारणा आणण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. यात अनेक चढ-उतारदेखील पाहायला मिळाले. मात्र निर्णय यशस्वी होणे जनतेच्या व्यापक समर्थनावरच शक्य आहे,अशी माहिती छापून चीनच्या या वृत्तपत्राने मोदींच्या नोटाबंदी निर्णयाचे कौतुक केले आहे.

Related Post